पुणे

पंधरा मिनिटांत वाहनांच्या रांगा; चक्राकार वाहतुकीचा प्रयोग सुरू

सकाळवृत्तसेवा

कोथरूड : नळस्टॉप चौकात नव्याने उभारण्यात येणाऱ्या दुहेरी उड्डाण पुलाच्या कामास सुरवात करण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून चौकातील वाहतूक वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी चक्राकार वाहतूक किंवा आहे त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करून रस्ता उपलब्ध करून देण्याच्या पर्यायांची चाचणी सुरू करण्यात आली. 

शनिवारी सकाळी साडेअकरापासून बॅरिकेड लावून रस्त्यावर चक्राकार वाहतूक योजनेची चाचणी घेण्यास सुरवात करण्यात आल्यानंतर कर्वे रस्त्यावर अवघ्या पंधरा मिनिटांतच वाहनांच्या रांगा लागण्यास सुरवात झाली आहे. यामुळे कर्वे रस्ता आणि एरंडवणा परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. 

कर्वे रस्त्यावरील अभिनव (नळस्टॉप) चौकात नव्याने उभारण्यात येणाऱ्या दुहेरी उड्डाण पुलाच्या कामास सुरवात करण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून चौकातील वाहतूक वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी चक्राकार वाहतूक किंवा आहे त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करून रस्ता उपलब्ध करून देण्याच्या पर्यायांचा विचार सुरू आहे. या दोन्ही पर्यायांची दोन ते तीन दिवस प्रायोगिक चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक वळविण्यात येणार असल्याचे "महामेट्रो' व्यवस्थापनाने स्पष्ट केले. 

अशी असेल चक्राकार वाहतूक 

कर्वे रस्त्याकडून डेक्कनकडे जाणाऱ्या वाहनांनी कर्वे रस्त्यावरून "एसएनडीटी' महाविद्यालयाच्या समोरून लॉ कॉलेज रस्त्याने आठवले चौकात जावे. 
- तेथून उजवीकडे वळसा घेऊन ही वाहने पुन्हा अभिनव चौकात येऊ शकतील. 
- एकेरी वाहतूक करण्यासाठी "एसएनडीटी' महाविद्यालय ते अभिनव चौकापर्यंत डेक्कनकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. डेक्कनकडून कर्वे रस्त्याने जाणारी वाहतूकही पूर्ववत ठेवण्यात येईल. 

असे केले आहे बॅरिकेडिंग 

वाहतूक पोलिसांनी यापूर्वीही चक्राकार वाहतुकीच्या पर्यायाचा विचार केला होता. मात्र, नागरिकांकडून विरोध झाल्यानंतर तो गुंडाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाचा विचार केला. महामेट्रोने कर्वे रस्त्यावर साडेआठ मीटर अंतराचे बॅरिकेडिंग करून उर्वरित रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. नळस्टॉप चौकातही दोन्हीकडून बॅरिकेडिंग करून रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला. त्याची चाचणी केल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. 

बॅरिकेडिंग केल्यानंतर वाहनांसाठी सरासरी पाच ते सात मीटरचा रस्ता उपलब्ध राहणार आहे. कर्वे रस्त्यावरील वाहनांची संख्या पाहता होणाऱ्या संभाव्य कोंडीचीही चाचपणी केली जाणार आहे. हा पर्याय यशस्वी झाल्यास रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील फूटपाथ काढून वाहनांसाठी रस्ता मोकळा करण्यात येईल. 
चक्राकार वाहतूक किंवा बॅरिकेडिंग, या दोन्हीही पर्यायांची प्रायोगिक चाचणी घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेणार आहे, अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT