Velhe became the first taluka in Pune district to become corona free 
पुणे

कोरोना लढा जिंकणारा पहिला तालुका; पुणे जिल्ह्यातील वेल्हे झाले कोरोनामुक्त!

मनोज कुंभार

वेल्हे(पुणे) : वेल्हे तालुक्यात सध्या एकही कोरोनाचा पेशंट नसल्याने वेल्हे तालुका हा जिल्ह्यात पहिला कोरोनामुक्त तालुका झाला असल्याची माहिती वेल्हेचे तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी तालुकास्तरीय कोरोना समन्वय समितीच्या बैठकीत दिली.

वेल्हे तहसिल कार्यालयात या बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.यावेळी सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अंबादास देवकर, जिल्हा कोवीड समितीचे सदस्य श्रीपाद कोंडे, खाजगी डॉक्टर प्रतिनिधी नलिनी जाधव, दिपस्तंभ संस्थेच्या सदस्या अनिता दिवेकर, वेल्हे व्यापारी असोसिशियनचे प्रतिनीधी दिनेश पुरोहित, रचना संस्था व पत्रकार प्रतिनीधी राजु रणखांबे, आदी उपस्थित होते.

यावेळी अधिक माहिती देताना तहसिलदार शिंदे म्हणाले, ''जिल्ह्यामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण हा वेल्हे तालुक्यात सापडला होता त्यानंतर प्रशासन व लोकप्रतिनीधींनी एकत्रित येवुन योग्य नियोजनाने कोरोनावर मात केल्याने जिल्ह्यातील वेल्हे तालुका हा पहिला कोरोनामुक्त तालुका झाला असुन तालुक्यामध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव होऊ नये म्हणुन विविध विषयावर चर्चा करण्यात आली. वेल्हे तालुक्यातील ४६५६ जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये ६५६ जण कोरोना पॉझिटीव्ह आले होते यापैकी २१ जणांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे.

 अशी होती वेल्हे तालुक्याची कोरोना रुग्णांची  आकडेवारी महिन्यानुसार 
एप्रिल-०
मे-    २५ 
जुन- २१
जुलै- ११८
ऑगस्ट-१२०
सप्टेंबर-२४८
ऑक्टेाबर-८७
नोव्हेंबर-२९
२१ डिसेंबर पर्यत-०

 कोरोना संख्या आटोक्यात आणण्यासाठी अशा केल्या उपाय योजना 
१)  कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी जिल्ह्यात सर्वात जास्त वेल्ह्यात केली गेली ती सरासरी ४२ टक्के एवढी होती.
२) तालुक्यातील नागरिकांची अन्नधान्यची गैरसोय होई नये म्हणुन जिल्ह्यात पहिली धान्यबॅंक  वेल्हे तहसिल कार्यालयात सुरु व ग्रामदुत संकल्पना वेल्हे तालुक्याचीच.
२) जीवनावश्यक वस्तुंची खरेदी विक्री करीता तालुकाबाहेर प्रवास करणाऱ्यांना व बाहेरुन येणा-या नागरीकांना जिल्हा परिषद शाळेमध्ये क्वारंटाईन
३) तालुक्यात येणारे सर्व नाके मार्ग बंद करत पोलीस व इतर कर्मचा-यांच्या मदतीने १८ ठिकाणी नाकेबंदी
४) ग्रामपंचायतींच्या माध्यमातुन गावात निर्जंतुकीकरणासाठी औषधाची फवारणी ,घरोघरी सॅनिटायझर मास्कचे वाटप
५) माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत घरोघरी आरोग्य तपासनी सर्वेक्षण.

 वेल्हे तालुक्यात कोरोनाने पुन्हा शिरकाव करु नये म्हणुन अशी घेतली जाणार काळजी 
१) पर्यटकांची संख्या वाढल्याने पोलीस यंत्रणेमार्फत विनामास्क कारवाई सुरु
२) शाळा सुरु झाल्याने मुख्याध्यापक केंद्रप्रमुख,शिक्षक यांना ऑनलाईन मार्गदर्शन 
३) तालुक्यातील सर्व शाळांमध्ये ग्रामपंचायतीच्या माघ्यमातुन वॉश बेसिनची सोय करणार, तर  विद्यार्थ्यांना बचत गटांनमार्फत मास्कचे वाटप
४)  तालुक्यातील सर्व व्यावसायिक,किराणा दुकानदार,हॉटेल चालकांना प्रतिबंधात्मक माहिती देणार
५)  संशयित रुग्ण आढळल्यास  खाजगी डॉक्टरांना सरकारी यंत्रणेस माहिती देण्याच्या सुचना 


''कोरोनाशी लढताना वरिष्ठ अधिकारी तालुक्यातील सर्वअधिकारी ,कर्मचारी ,व लोकप्रतिनिधी,पत्रकारांसह नागरिकांच्या सहभागामुळे वेल्हे तालुका कोरोनामुक्त झाला आहे याचे श्रेय सर्वांना जाते''
-  शिवाजी शिंदे तहसीलदार ,वेल्हे 


''वेल्हे तालुका दुर्गम असला तरी येथील सर्व शासकीय खात्यांचे प्रमुख कार्य तत्पर आहेत.प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची सांगड योग्य पध्दतीने झाल्यास सकारात्मक बदल घडून एक आदर्श निर्माण होतो.''
- अमोल नलावडे जिल्हा परिषद सदस्य
===========

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT