Dengue
Dengue  sakal
पुणे

वेल्ह्यात डेंगूच्या आजाराचे थैमान; साथीच्या आजाराने नागरिकांचे हाल

मनोज कुंभार

वेल्हे तालुक्यात सध्या साथींच्या आजाराने थैमान घातले असुन वेल्हे गावच्या परिसरात डेंगूचे बारा रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वेल्हे - वेल्हे तालुक्यात सध्या साथींच्या आजाराने थैमान घातले असुन वेल्हे गावच्या परिसरात डेंगूचे बारा रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकट्या वेल्ह्यात डेंगूचे नऊ रुग्ण आढळल्याने ग्रामपंचायतीने औषध फवारणी करण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे.

साथींचे आजार व डेंगूच्या आढळलेल्या रुग्णांबाबत वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. परमेश्वर हिरास यांनी दुजोरा दिला असून, नागरिकांनी याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वेल्हे ग्रामीण रुग्णालयात डेंगूच्या आजाराचे रुग्ण येत असुन १ सप्टेंबर पासुन आज पर्यत एकुण ४८ लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये १२ रुग्ण डेंगूची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. तर १२ पैकी ९ रुग्ण एकट्या वेल्हे येथील आहेत. त्य़ामुळे वेल्हे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.

वेल्हे गावातील नागरिक साथीच्या आजाराने त्रस्त झाले असुन शासकीय दवाखान्यात उपचारासाठी गर्दी होत आहे. तर खासगी डॅाक्टरांकडे देखील उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. वेल्हे हे तालुक्याच्या ठिकाणी असल्याने शासकीय सर्व कार्यालये, बॅंका, पोलीस स्टेशन, बाजारपेठ आदी कामासाठी तालुक्यातील नागरिक येत असतात. वेल्हे येथे तालुक्यातील नागरिकांची कायमच वर्दळ असते. परंतु साथीच्या आजाराने परिसरात येण्यास नागरिक घाबरत आहेत.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे तालुक्यातील अनेक जण थंडी, ताप, सर्दी, अंगदुखी असे विविध साथीच्या आजाराने त्रस्त झाले आहेत. त्यातच तालुक्याचे व किल्ले तोरणा गडाच्या पायथ्याशी असणारे वेल्हे गावात स्वच्छ गटारे नाहीत, घन कच-याची कोणतीही उपाययोजना नाही. ग्रामपंचायतीची घंटागाडी बंद अवस्थेत उभी आहे. गावातील हॅाटेल चालकांकडुन घनकचरा शासकीय धान्य गोदामाच्या व महावितरण कार्यालयाच्या शेजारी टाकत आहेत. तर गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.ग्रामपंचायतीने या साथीच्या आजारासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र करंजावणे अंतर्गत येणा-या काही गावात देखील डेग्युचे रुग्न सापडले आहेत. डेंगूच्या आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर तालुक्यातील खासगी डॅाक्टरांकडे रुग्नांची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे.

१) साथीच्या आजाराचे अनेक रुग्ण सध्या रुग्णलयात उपचारासाठी येत आहेत. वेल्हे गावात जास्त प्रमाणात डेंगूची लागण झालेले रुग्ण आहेत. ग्रामपंचायतीकडुन गावात औषध फवारणीसह विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे.

- डॉ. परमेश्वर हिरास, वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय ,वेल्हे .

२) गावात औषध फवारणी सुरू आहे. औषध फवारणी मशीन खराब झाल्याने दुरुस्तीसाठी पाठवलेले आहे. दुरुस्त करून आल्यावर पुन्हा फवारणी केली जाणार आहे. नागरिकांनी आपापल्या घरासमोर वैयक्तिक स्वच्छता करावी.

- संदीप नगीने, सरपंच, वेल्हे.

३) एकट्या वेल्हे गावातच डेंगूच्या आजाराने अनेक नागरिक त्रस्त असून याबाबत ग्रामपंचायतीने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

- संतोष मोरे, माजी सरपंच, वेल्हे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी महायुतीची बैठक

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT