scholarships
scholarships sakal
पुणे

शिष्यवृत्तीच्या अर्जांची पडताळणी पूर्ण; आठवड्याभरात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेतर्फे इयत्ता १०वी,१२वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झाली असून, पुढील आठवड्याभरात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा केले जाणार आहेत. यंदा १६ हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, ३१ मार्चपूर्वी हे पैसे वाटप केले जाणार असल्याचे वृत्त यापूर्वीच ‘सकाळ’ने दिले होते.

महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसाहाय्य योजनेतंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी दहावी व बारावीमध्ये खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी ८० टक्केपेक्षा जास्त गुण असणे आवश्‍यक आहेत आणि महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थी आणि ४० टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना ६५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले तर १०वीच्या विद्यार्थ्यांना १५ हजार आणि १२वीसाठी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

गेल्यावर्षी कोरोनाची दुसरी लाट आल्याने परीक्षा न घेता वार्षिक कामगिरीवर आॅगस्ट महिन्यात निकाल लावण्यात आले होते. महापालिकेने यानंतर शिष्यवृत्तीचे अर्ज मागविले होते. कोरोनामुळे पदवीची प्रवेश परीक्षा लांबणीवर पडली त्यामुळे २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्यास मुदत वाढविण्यात आली. यामुदतीनंतर महापालिकेकडे इयत्ता १०वीचे ७ हजार ८७८ आणि इयत्ता १२वीचे ८ हजार ९६ असे १५ हजार ९७४ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज केले आहेत.

या अर्जांची पडताळणी करण्याचे काम सुरू होते. ३१ मार्च पूर्वी पैसे वितरित न केल्यास त्यास पुन्हा वेगळ्या मान्यता घेण्याची वेळ येते आणि त्यात परत एक दोन महिने गेले असते. त्यामुळे समाजविकास विभागाने अर्ज पडताळणीचे काम गतीने केले आहे. समाजविकास विभागाची सर्व तयारी झाली असून, पैसे जमा करण्यासाठी आयुक्तांची अंतिम मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. ही मान्यता मिळताच पुढील काही दिवसात पैसे बँक खात्यात जमा होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अमित शहांनी बोरिवलीमध्ये भाड्याने घर घेतलंय- संजय राऊत

IPL 2024 DC vs RR : राजधानी 'दिल्ली'साठी आर या पार...! प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी आज राजस्थानवर विजय आवश्यक

SCROLL FOR NEXT