पुणे

सूर्याचा पुन्हा प्रकोप

CD

सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. १२ : विदर्भात मागील आठवड्यात उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाल्यानंतर आता पुन्हा एकदा सूर्य तळपला असून आज अकोल्याचा पारा ४५.६ अंशांवर पोहोचला आहे. अकोल्याबरोबरच अमरावतीमध्येही ४५.४ अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातही उन्हाचे चटके बसत असून येत्या काही दिवसांत या भागातील तापमान दोन ते तीन अंशांनी वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
विदर्भात अपेक्षेप्रमाणे सूर्याचा प्रकोप वाढला आहे. नागपूरकरांनाही मंगळवारी उन्हाचे जोरदार चटके जाणवले. प्रादेशिक हवामान विभागाचा पुढील चार दिवस ‘यलो अलर्ट’ असल्यामुळे उन्हाचे चटके आणखीन वाढणार आहेत.
विदर्भात सगळीकडेच उन्हाचा तीव्र प्रभाव दिसून आला. नागपूर व अकोल्यासह सर्वच जिल्ह्यांच्या तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत नागपूरचा पारा एका अंशाने वाढून ४३ अंशांवर गेला. तर अकोल्याच्या तापमानातही अर्ध्या अंशाची वाढ झाली. येथे नोंद झालेले ४५.६ तापमान विदर्भासह संपूर्ण राज्यात सर्वाधिक ठरले. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधील तापमान ४२ अंशांच्या वर होते. रात्रीच्या किमान तापमानातही एक ते दोन अंशांची वाढ झाल्याचे दिसून आले.
मराठवाड्यात पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याचे तापमान दोन ते तीन अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या (मुंबई) अंदाजानुसार आज, १२ तारखेला रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत, १३ तारखेला छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांत, १४ तारखेला छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत आणि १५ तारखेला छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात कमाल तापमानात पुढील चार दिवसांत दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, विस्तारित हवामान अंदाजानुसार १५ ते २१ मे या कालावधीत मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातही सोलापूर, अहिल्यानगर, पुणे येथे तापमानाचा पारा ४१ अंशांच्या आसपास होता. त्यामुळे दुपारच्या वेळात रस्त्यांवर कमी रहदारी दिसत आहे.

विदर्भातील कमाल तापमान
शहर तापमान
अकोला ४५.६
अमरावती ४५.४
नागपूर ४३.०
वर्धा ४४.२
बुलडाणा ४३.५
ब्रह्मपुरी ४३.५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : ड्रग्स तस्करी प्रकरणातील वाँटेड आरोपी विरेंदर बसोयाला पुण्यात आणणार

SCROLL FOR NEXT