Vidhan Sabha 2019 road map of NCP's development in Pune
Vidhan Sabha 2019 road map of NCP's development in Pune 
पुणे

Vidhan Sabha 2019 : असा आहे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पुण्याच्या विकासाचा 'रोड मॅप'

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहरात प्रदूषण नियंत्रण आणि कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी इको-फ्रेंडली बांधकामावर भरणे, सौर उर्जेचा वापर वाढविणे, शहराती "ग्रीन बेल्ट' वाढविण्यासाठी "अर्बन फॉरेस्ट' निर्माण करणे, शहरात नेटके आणि सुनियोजीत नगर व्यवस्थापन करणे, महिला, मुले आणि जेष्ठ नागरिकांसाठी विविध सुविधा निर्माण करणे, झोपडपट्टीधारकांना आहे त्याच ठिकाणी मालकी हक्काचे पक्के घर उभारून देणे आदी विविध मुद्‌द्‌यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने भर दिला आहे.

खासदार वंदना चव्हाण यांनी पुणे शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने तयार केलेल्या "रोड मॅप'ची माहिती देताना म्हणाल्या, 'शहराची वाटचाल मेट्रोच्या दिशेने होत आहे. शहरीकरणामुळे नव्या समस्या निर्माण होत आहेत. स्थलांतरीतांचीही संख्या वाढत आहे. त्यांचा सखोल विचार करून राष्ट्रवादी कॉंग्रेसने "शपथनामा' तयार केला आहे. राज्यातील अनेक शहरांच्या विकासासाठी तो पूरक ठरणार आहे.

पुणे शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस महापालिकेत सत्तेवर असताना या पूर्वी बीआरटी उभारली, शहर पर्यटनाला चालना दिली, उद्यानांची संख्या वाढविली, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे आदी अनेक योजना राबविल्या आहेत. सध्या मात्र शहरात विकासाची प्रक्रिया मंदावली आहे. तिला वेग देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे. त्यासाठी नगर नियोजन, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, कल्याणकारी योजना आदींवर विशेष लक्ष असेल, असेही चव्हाण यांनी सांगितले.

विकासाचा "रोड मॅप' तयार करताना राष्ट्रवादीने समाजातील विविध तज्ज्ञांची मते जाणून घेवून त्यांचा अभ्यास केला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस - (चिन्ह- घड्याळ)
- कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रणात आणणे, त्यासाठी सार्वजनिक व्यवस्था सक्षम करणे, एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे आणि, कचरा आणि सांडपाण्यावर पुरेपूर प्रक्रिया करणे
- पुणे मेट्रोपॉलिटन रिजनचा सुनियोजीत विकास करण्यासाठी "एमएमआरडीए'च्या धर्तीवर नियोजन प्राधिकरण स्थापन करणे
- पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी शहरी भागात वृक्षारोपण वाढविणे (अर्बन फॉरेस्ट), ईको- फ्रेंडली बांधकाम, सौर उर्जेचा वाढता वापर करणे
- विकास आराखड्याची वेगाने अंमलबजावणी करण्यासाठी निश्‍चित कालमर्यादा ठरविणार
- सुरेखित शहरासाठी समिती स्थापन करणार
- नागरिकांना आनंददायी पद्धतीने जीवन जगता येईल, अशा पद्धतीने शहर निर्माण करणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT