Matadan
Matadan 
पुणे

Vidhan Sabha 2019 भोरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या गावांत चांगले मतदान

विजय जाधव

भोर (पुणे) : भोर विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 5.66 टक्‍क्‍यांनी घसरली आहे. 2014 च्या निवडणुकीत 68.57 टक्के मतदान झाले होते, तर या वेळी केवळ 62.91 टक्के मतदान झाले. पाच वर्षांत मतदारसंघात 42 हजार 521 नवीन मतदारांची वाढ होऊनही या वेळी पावसामुळे मतदान कमी प्रमाणात झाले. मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या गावांत मात्र 60 ते 70 टक्‍क्‍यांपर्यंत मतदान झाले आहे.
दरम्यान, घटलेल्या मतदानाचा फायदा कोणाला? याबाबत चर्चेला उधाण आले आहे. सात उमेदवार रिंगणात असले तरीही आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे व युतीचे उमेदवार कुलदीप कोंडे यांच्यापैकी कोण बाजी मारणार हे मतमोजणी झाल्यावर समजेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडीचा धर्म पाळला असून काही स्थानिक पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आमदार संग्राम थोपटे यांनाच विजयी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तर भाजपने युतीचे उमेदवार कुलदीप कोंडे यांना विजयी करण्यासाठी कंबर कसली असून त्यांना राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी साथ दिली आहे.
2014 च्या निवडणुकीत मतदारांची संख्या 3 लाख 17 हजार 733 होती, तर या वेळी ही संख्या 3 लाख 60 हजार 254 एवढी आहे. मतदारसंघात भोर तालुक्‍यात मतदानाची टक्केवारी जास्त असून मुळशी तालुक्‍यात मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. तर वेल्हे तालुक्‍यात सरासरी मतदान झाले आहे.
मतदारसंघातील भोर, वेल्हे व मुळशी तालुक्‍यातील 529 मतदान केंद्रांपैकी सर्वाधिक 90.11 टक्के मतदान हे शिवसेनेचे उमेदवार कुलदीप कोंडे यांच्या केळवडे (ता. भोर) गावातील एका केंद्रावर झाले आहे. तर सर्वांत कमी मतदान साखरी (ता. मुळशी) येथे 28.10 टक्के झाले आहे. साळवडे (ता. भोर) गावात दुसऱ्या क्रमांकाचे 89.69 टक्के मतदान झाले असून केळवडे गावातील दुसऱ्या मतदान केंद्रावर तृतीय क्रमांकाचे 87.43 टक्के मतदान झाले. भोरमधील 24 मतदान केंद्रांवर आणि मुळशीतील एका मतदान केंद्रावर 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. मुळशीतील 14 गावांमध्ये 42 टक्‍क्‍यांपेक्षा कमी मतदान झाले आहे. भोर शहरातील 17 मतदान केंद्रांवर 62.90 टक्के मतदान झाले आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्या हातनोशी (ता. भोर) गावात 82.61 टक्के मतदान झाले. उत्रौली येथील 3 मतदान केंद्रांवर 60.28 टक्के मतदान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT