Shivajirao-Adhalrao-Patil
Shivajirao-Adhalrao-Patil 
पुणे

विधानसभेच्या चर्चांना अर्थ नाही - आढळराव

सकाळवृत्तसेवा

राजगुरुनगर - ‘खेडचे आमदार सुरेश गोरे आणि माझा चांगला संवाद आहे. आम्ही एकविचाराने काम करीत आहोत. त्यामुळे माझा कोणालाही छुपा पाठिंबा वगैरे असण्याचा प्रश्न नाही. विधानसभेला खूप वेळ असताना उगाच चर्चांना काहीही अर्थ नाही,’’ असे मत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खेड तालुका शिवसेनेतील राजकीय घडामोडींबाबत व्यक्त केले. 

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघासाठी तिकिटाच्या स्पर्धेत उतरून माजी सभापती रामशेठ ठाकूर यांनी गोरे यांना आव्हान दिले आहे. त्यांना आढळराव यांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. त्यावर आढळराव यांनी ठाकूरांना छुपा पाठिंबा असल्याचा स्पष्ट इन्कार केला. याबाबत ते म्हणाले, ‘‘खासदार या नात्याने मतदारसंघातील सर्व तालुक्‍यांमधील विकासकामांबाबत आणि समस्यांबाबत लक्ष घालतो. मात्र, तालुक्‍याच्या पक्षीय राजकारणात कधी हस्तक्षेप केलेला नाही. सर्व शिवसैनिकांशी माझे उत्तम संबंध आहेत.’’ 
खेड तालुक्‍यातही गोरे आणि मी एकविचाराने विकासकामे करतो.

त्यांच्याविरोधात विनाकारणच कोणाला पाठिंबा द्यायची चर्चा सुरू झाल्याचे मलाच आश्‍चर्य वाटते, असे आढळराव यांनी सांगितले. ठाकूरांना २००९ मध्ये शिवसेनेचे तिकीट मिळावे, यासाठी प्रयत्न केले होते. त्यास यश आले नाही. त्यानंतर ठाकूर आणि माझा कधीही राजकीय संबंध आलेला नाही. त्या वेळी तिकीट खांडेभराडांना मिळाल्यावर पक्षादेश स्वीकारून त्यांचा प्रचार केला होता. त्यामुळे पक्ष घेईल त्या निर्णयाला बांधील राहणार आहे. अनाठायी वादात ओढू नये, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT