vidhansabha election 2019
vidhansabha election 2019 
पुणे

वळसे-पाटलांच्या विजयानंतर आंबेगावात जल्लोष

सकाळ वृत्तसेवा

टाकळी हाजी :  गुलालाची उधळण आणी फटाक्यांची आतषबाजी करत आंबेगाव विधानसभा मतदार संघातील शिरूरच्या ३९ गावांनी निकालानंतर दिवाळी साजरी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना ३९ गावातून तब्बल २८ हजार ६१६ मतांचे मताधिक्य दिले. 

आंबेगाव विधानसभा मतदार संघात शिरूरचे ३९ गावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. या गावांमध्ये टाकळी हाजी - कवठे येमाई, रांजणगाव - कारेगाव आणि केंदूर - पाबळ जिल्हा परिषद असे गट आहेत. यासाठी माजी आमदार पोपटराव गावडे, सुर्यंकात पलांडे, मानसिंग पाचुंदकर, विश्वास कोहकडे, सवीता बगाटे, स्वाती पाचुंदकर, सुनीता गावडे, अरूणा घोडे, सवीता पऱ्हाड, प्रकाश पवार, राजेंद्र गावडे, भाऊसाहेब औटी, दामु घोडे व गावगावच्या कार्यकर्त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली. टाकळी हाजी- कवठे गटातून ९ हजार ९३०, रांजणगाव- कारेगाव गटातून ९ हजार ७२० तर केंदूर - पाबळ गटातून ८ हजार ९८२ मताचे मताधिक्य दिले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांना १ लाख २६ हजार १२० मते पडली आहेत. दरम्यान शिरूरच्या ३९ गावातील २८ हजार ६१६ मतांचा समावेश आहे. मागील पंचवार्षिक निवडणूकीत ३९ गावांची १८ हजार मते मिळाली होती. त्यात बदल होऊन यावेळी अधिकचे मतदान झाले आहे. विकास कामांचा जोर व मतदारांशी असणारा समन्वय यामधून त्यांना मतदारांनी चांगली पसंती दिली आहे. 

'विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे राज्याच नेतृत्व आहे. त्यांनी ३९ गावात केलेली विकास कामे यामुळे जनतेचा कौल त्यांच्या पाठिशी असतो. भविष्यात या भागाचा कायापालट त्यांच्या माध्यमातून होणार आहे. ३९ गावातील सर्व मतदारांचे आभार', असे मत माजी आमदार पोपटराव गावडे यांनी व्यक्त केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT