Shivsena-BJP
Shivsena-BJP 
पुणे

पुणे जिल्ह्यात चार जागांवर युतीला ‘रेड अलर्ट’

संभाजी पाटील

पुणे - देशभरात विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे बळ वाढलेले असताना पुणे जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेच्या २१ पैकी आठ मतदारसंघांत आघाडी घेऊन परिस्थितीत सुधारणा केली आहे. पुरंदर, जुन्नर आणि खेड-आळंदी या शिवसेनेच्या तीन; तर शिरूर या भाजपच्या जागेवर लोकसभा निवडणुकीत मताधिक्‍य घेऊन भाजप-सेनेला ‘रेड अलर्ट’ दिला आहे.

संपूर्ण देशभरात भाजपला अनुकूल वातावरण असताना जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती हा बालेकिल्ला शाबूत ठेवलाच; पण शिरूरची जागाही शिवसेनेकडून खेचून आणली. जिल्ह्यातील या दोन विजयाने राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभानिहाय जागांमध्येही सुधारणा केल्याचे निवडणूक निकालांवरून स्पष्ट होते. 

जिल्ह्यात विधानसभेच्या भाजपच्या सर्वाधिक बारा, शिवसेनेच्या तीन, रासप एक, मनसेची एक; पण या जागेवरील आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, अशा भाजप-शिवसेना महायुती मिळून १७ जागा आहेत. ‘राष्ट्रवादी’कडे तीन; तर काँग्रेसकडे एक जागा आहे. लोकसभा निवडणुकीत पुणे शहरातील आठ आणि पिंपरी-चिंचवडमधील तीनही विधानसभा जागांवर मताधिक्‍य राखण्यात महायुतीला यश आले. मात्र, शिवसेनेचे मंत्री असणाऱ्या विजय शिवतारे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला ९ हजारांचे मताधिक्‍य मिळाल्याने काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह या मतदारसंघात वाढला आहे. या जागेसाठी आता काँग्रेस आग्रही आहे. 

जुन्नर विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव यांना गेली तीन निवडणुका मताधिक्‍य मिळत होते. या मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ हजारांची मोठी आघाडी घेतली आहे. या मतदारसंघाचे आमदार शरद सोनवणे हे ‘मनसे’मधून विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या दृष्टीने विधानसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’चे तगडे आव्हान असेल. 

खेड-आळंदी मतदारसंघात सध्या सेनेचे सुरेश गोरे आमदार आहेत. या मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’ने ७ हजार ४४६ मतांची आघाडी घेतली आहे. गोरे यांच्यासाठी हा इशारा असेल. मोठा संघर्ष करून २०१४ मध्ये शिरूरची जागा भाजपच्या बाबूराव पाचर्णे यांना मिळाली होती. मात्र, या ठिकाणीही तब्बल २६ हजार मतांची आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या ताकदीने हा मतदारसंघ लढविण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजप-शिवसेनेला चार मतदारसंघात धोक्‍याचा इशारा मिळाला आहे. 

पुण्यातील हडपसर मतदारसंघातही आढळराव यांना केवळ ५ हजारांचे मताधिक्‍य मिळाले. त्यामुळे काँग्रेस आघाडीचे विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहरातील या मतदारसंघावर अधिक लक्ष असेल. त्या दृष्टीने ‘राष्ट्रवादी’ची तयारीही सुरू झाली आहे. इंदापूर, भोर या मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेसचे मताधिक्‍य वाढले असल्याने विधानसभेसाठी जिल्ह्यात भाजपसमोर ‘राष्ट्रवादी’चे आव्हान कायम राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील पक्षनिहाय मताधिक्‍य 
१३ - भाजप-शिवसेना युती  
८ - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील पक्षनिहाय बलाबल
१२ - भाजप 
४ - शिवसेना  
३ - राष्ट्रवादी
१ - रासप 
१ - काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT