pune  Sakal
पुणे

पुणे : गावठी दारु वाहतुक करणारी जीप पकडली,राजगड पोलिसांची कारवाई

4 लाख 90 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

किरण भदे - सकाळ वृत्तसेवा

नसरापू : सारोळ (Sarol) ता.भोर येथे ता. 19 सप्टेंबर (September) रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास राजगड (Rajgad) पोलिसांनी (Police) गावठी दारुची वाहतुक करणारी बोलेरो जीप (Jeep) पकडली असुन त्यामधील 40 प्लास्टिकच्या कँन मधील 1 लाक 40 हजार रुपयांची दारु व वाहतुक करणारी जीप असा मिळुन 4 लाख 90 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांना अवैध दारु वाहतुकी बाबत मिळालेल्या माहीती नुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्यासह सहाय्यक फौजदार कृष्णा कदम,पोलिस हवालदार जगदीश शिरसाट,शिपाई योगेश राजीवडे हे पोलिस पथक रात्रीची गस्त घालत असताना सारोळा ता.भोर गावच्या हद्दीत बस स्टाँप जवळ पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास विर सारोळा रस्त्यावरुन आलेल्या बोलेरो जीप क्रमांक एम एच 12 आर एन 9743 ची तपासणी केली असता जीप मध्ये मागील बाजुस प्लास्टिकच्या 35 लिटर मापाच्या 40 कँन मध्ये सुमारे 1 हजार 400 लिटर गावठी दारु असल्याचे निष्पन्न झाले या बाबत पोलिसांनी कारवाई करत जीप चालक राजु लक्ष्मण जानकर वय 22 रा.चिव्हेवाडी ता.पुरंदर,महेंद्र राजेंद्र कुंभार वय 31 रा.शिरवळ शेखमेरवाडी ता.खंडाळा जि.सातारा,व बापु धोंडिबा कोकरे वय 32 रा. कांबरे ता.भोर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार जगदीस शिरसाठ यांनी फिर्याद दिली असुन मुंबई प्रोव्हीबिशन अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दारुची वाहतुक पुणे हडपसर येथुन विर सारोळा रस्त्याने शिरवळ जि.सातारा गावाकडे होत होती,या गुन्ह्यात 1 लाख 40 हजार रुपयांची गावठी दारु व वाहतुक करणारी जीप किंमत 3 लाख 50 हजार असा मिळुन 4 लाख 90 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी दिली.

गणपती विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर मोठ्या प्रमाणात गावठी दारु पकडल्याने होणारया अनुचित प्रकारास आळा बसला आहे या बद्दल राजगड पोलिसांचे वरिष्ठ पोलिस अधिकारयांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT