माजी सभापती अरविंद ढमढेरे. sakal
पुणे

तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतराला ग्रामस्थांचा विरोध

निवेदनाची प्रत खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार ऍड अशोक पवार यांना पाठविली

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील सध्या ग्रामपंचायत मालकीच्या ताब्यात असलेले दुय्यम निबंधक कार्यालयाचे दुसरीकडे खासगी जागेत स्थलांतर करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला असून, स्थलांतर करू नये असे निवेदन बाजार समितीचे माजी सभापती अरविंद ढमढेरे यांनी ग्रामस्थांच्या स्वाक्षरीसह उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी व नोंदणी महानिरीक्षक यांना पाठविले आहे. निवेदनाची प्रत खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार ऍड अशोक पवार यांना पाठविली आहे.येथील ग्रामपंचायत मालकीच्या जागेत असलेले दुय्यम निबंधक कार्यालय पार्किंग, प्रशस्त व आवश्यक जागा आणि इतर सुविधा नसल्याच्या कारणावरून दुसरीकडे खासगी जागेत स्थलांतर होणार असल्याचे ग्रामस्थांना समजल्यानंतर, शनिवारी येथील दुय्यम निबंधक कार्यालय दुसरीकडे स्थलांतरित करू नये या मागणीसाठी ग्रामस्थांनी सभा घेऊन तीव्र विरोध केला आहे. यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करून स्थलांतराला विरोध केला.

सध्या असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयामुळे ग्रामपंचायतीला मासिक उत्पन्न मिळत असून, येथील निबंधक कार्यालय असलेल्या परिसरात व्यापारी, मुद्रांक विक्रेते, वकील वर्ग व इतर लहान मोठे व्यवसायिक व्यवसाय करीत आहेत. सध्याचे कार्यालय गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असून येथे बस स्थानक, ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस दूरक्षेत्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, पार्किंग आदी सुविधा आहेत. असे असताना कोणतेही सबळ कारण नसताना सध्या ग्रामपंचायत जागेत असणारे दुय्यम निबंधक कार्यालय इतरत्र खासगी जागेत स्थलांतरित करू नये. कार्यालय स्थलांतरामुळे ग्रामस्थ व व्यवसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. येथील दुय्यम निबंधक कार्यालय दुसरीकडे खासगी जागेत स्थलांतर करण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध असल्याचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर बाजार समितीचे माजी सभापती अरविंद ढमढेरे, महेंद्र पवार, श्रीकांत सातपुते, महेश ढमढेरे, महेश भुजबळ, सुनील ढमढेरे, ऍड दीपक ढमढेरे, ऍड सुरेश भुजबळ, कैलास नरके, नवनाथ कांबळे, चेतना ढमढेरे, श्रीकांत ढमढेरे, बाळासाहेब ढमढेरे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT