3pirangut.jpg
3pirangut.jpg 
पुणे

गांभीर्याने तपास न केल्यानेच विनायकने गमाविला जीव

सकाळवृत्तसेवा

पुणे : बेकायदा बांधकामाविरुद्ध आवाज उठविणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसट यांचा खून करुन टाकलेला मृतदेह लवासात मुठा गावातील दरीमध्ये मंगळवारी पहाटे आढळुन आला. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणाचा तत्काळ गांभीर्याने तपास न केल्यामुळे विनायकला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. 

विनायक शिरसट हे 30 जानेवारीला बेपत्ता झाले होते, त्यांनंतर विनायकचे वडील व भाऊ भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले होते. विनायक माहिती अधिकार कायद्याचा वापर करुन अनधिकृत बांधकाम करणाऱ्याविरुद्ध आवाज उठवित होते. त्यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिकांनीच त्यांचे अपहरण केल्याची फिर्याद शिरसट कुटुंबियांना द्यायची होती. प्रत्यक्षात पोलिसांनी हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतरही शिरसट यांचा तपास करण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांकडे सतत पाठपुरावा केला, मात्र पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही.

..मग सुत्रे हलली ! 
अखेर या कुटुंबाने पत्रकार परिषद घेऊन पोलिसांकडुन होणारे दुर्लक्षाबाबत पोलिस आयुक्तलयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. दरम्यान, सोमवारी शिरसट कुटुंबीय व रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडीतर्फे पोलिस आयुक्तलयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर कुटुंबीय व युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनी पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांची भेट घेतली. वेंकटेशम यांनी हा तपास गुन्हे शाखा करेल, असे आश्वासन दिले. त्यानंतर एका रात्रीत पोलिस दल हलले आणि शिरसट यांचा मृतदेह सापडला.

रामदास आठवले यांच्या फोननंतर अपहरणाचा गुन्हा दाखल
शिरसट हे रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी होते. त्यांच्या तपासाबाबत पोलिसांनी दुर्लक्ष केल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मिळाली. आठवले यांनी स्वत: पोलिस अधिकाऱ्यांना फोन करुन अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपास करण्यास सांगितले. त्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप शैलेंद्र चव्हाण यांनी केला.


 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : देशात सकाळी 11 वाजेपर्यंत 25.41 टक्के मतदानाची नोंद; महाराष्ट्रात 18.18 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT