विनयभंगप्रकरणी
एकावर गुन्हा दाखल
महाबळेश्वर, ता. २४ ः येथील एका नामांकित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी सहाय्यक व्यवस्थापकाविरुद्ध महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला वेलनेस मॅनेजर पदावर कार्यरत असून, घटनेच्या दिवशी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ती कार्यालयीन कामात व्यस्त होती. यावेळी त्याच हॉटेलमध्ये कार्यरत असलेल्या ३८ वर्षीय सहाय्यक व्यवस्थापकाने अचानक मागून येत तिची मान पकडली व अनुचित स्पर्श केला. याबाबत महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस हवालदार शेलार अधिक तपास करत आहेत.
-----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.