vishwas nangre 
पुणे

रश्मी शुक्लांची तब्बल 6 तास चौकशी, आता नांगरे पाटलांचा जबाब

सकाळ डिजिटल टीम

पुण्याच्या कोरेगाव-भीमा या ठिकाणी झालेल्या दंगल प्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi shukla) चौकशीसाठी आयोगासमोर हजर झाल्या. यावेळी त्यांची तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. याआधी परमबीर सिंग यांनाही समन्स बजावण्याचे आदेश देण्यात आले होते. चौकशी आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी संबंधित अर्ज केला होता. कोरेगाव भीमाला हिंसाचार झाला, त्यावेळी परमबीर सिंगअतिरिक्त पोलीस महासंचालक होते. तर रश्मी शुक्ला पुण्याच्या पोलीस आयुक्त पदावर होत्या. आता या प्रकरणात आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. हिंसाचारावेळी ते कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक होते.

२०१८ मध्ये झालेल्या दंगलीत झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने या प्रकरणी कोलकाता हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल (High court) यांच्या अध्यक्षतेखालील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या नेतृत्वाखालील चौकशी आयोग नेमला आहे. या आयोगाकडून सध्या शुक्ला यांची साक्ष नोंदवण्यात आली.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनाही समन्स बजावण्यात आले होते, परंतू ते हजर झाले नाहीत. त्यावेळी सिंग हे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) या पदावर होते. शुक्ला यांनी मात्र आयोगासमोर हजेरी लावली. तसेच शपथपत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितला. या कार्यक्रमाबाबत पुणे पोलिसांकडून काही कागदपत्रे मिळणे बाकी असल्याचं त्यांनी आयोगापुढं सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Action: डॉमिनोजनंतर तुकाराम मुंढेंचा झेप्टो, इन्स्टामार्टसह फ्रुटीवर प्रहार; ११ तास छापेमारी, १४ परवाने निलंबित

BSNL ग्राहकांना स्वातंत्र्य दिनाची 'डिजिटल भेट', एक रुपयात मोबाइल सेवा; २५ हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

Independence Day Live Update : पुण्यातील विधानभवन ध्वजारोहण सोहळ्यात आसन व्यवस्थेवरून नीलम गोरे नाराज

D.B. Dhamanaskar: ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांचे निधन

SCROLL FOR NEXT