TMB26B03814
टेंभुर्णी (ता. माढा) : विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या दोन्ही युनिटमध्ये उत्पादित १५ लाख ११ हजार ७५५ व्या साखर पोत्याच्या पूजनप्रसंगी दिलीप लव्हटे, संभाजी थिटे, अनिल वीर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी.
---
विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा हंगाम समाप्त
२०.८६ लाख मे. टन ऊस गाळप; १५.११ लाख साखर पोत्यांचे उत्पादन
सकाळ वृत्तसेवा
टेंभुर्णी, ता. २० : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक १ पिंपळनेर व युनिट क्रमांक २ करकंब या दोन्ही युनिटचा २०२५-२६ हंगामाचा सांगता समारंभ शुक्रवारी (ता. २०) पार पडला. या हंगामात उत्पादित एकूण १५ लाख ११ हजार ७५५ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे फायनान्स मॅनेजर दिलीप लव्हटे व केन मॅनेजर संभाजी थिटे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थापक चेअरमन तथा माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक एककडे १५ लाख ५२ हजार १८२ मे. टन व युनिट क्रमांक दोनकडे ५ लाख २४ हजार ४५१ मे. टन असा एकूण २० लाख ८६ हजार ६३३ मे. टन ऊस गाळप करण्यात आला. त्यातून १५ लाख ११ हजार ७५५ क्विंटल साखर उत्पादन झाले.
दोन्ही युनिट मिळून ७ कोटी ०९ लाख ७० हजार ५०० युनिट वीज विक्री करण्यात आली. युनिट क्रमांक एकच्या डिस्टिलरी विभागात शुगर सिरपपासून ३ कोटी ५७ लाख बल्क लिटर इथेनॉल उत्पादन झाले. ऊस उपलब्धता कमी असल्याने यंदाचा हंगाम लवकर संपुष्टात आला.
हंगामाच्या सुरवातीपासून ऊस बिले दहा दिवसांच्या अंतराने अदा करण्यात आली. गाळपास आलेल्या उसास प्रति मेट्रिक टन ३०२५ रुपये दराने देयक अदा करण्यात आले असून, १० फेब्रुवारीअखेर ५९६ कोटी २२ लाख रुपये ऊस बिलापोटी अदा करण्यात आले. तसेच ३१ जानेवारीअखेर तोडणी व वाहतूक बिलासाठी १५४ कोटी ०३ लाख रुपये देण्यात आले.
यावेळी जनरल मॅनेजर पोपट येलपले, चीफ केमिस्ट अनिल जगताप, चीफ इंजिनिअर संजय कैचे, ईडीपी मॅनेजर रमेश खेडकर, कामगार प्रतिनिधी अनिल वीर तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---
कर्मचाऱ्यांना १५ दिवसांचा पगार बक्षीस
दोन्ही युनिटच्या यशस्वी कामकाजासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंधरा दिवसांच्या पगाराइतकी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार असून, कामगारांना त्रिपक्षीय करारानुसार जानेवारीपासून १० टक्के वेतनवाढ लागू करण्यात येत आहे. हा हंगाम सभासद, ऊस पुरवठादार, तोडणी मजूर, वाहनमालक, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वी झाल्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.