पुणे

जिल्‍ह्यात सव्वा चार लाख मतदार असंकलित

CD

जिल्‍ह्यात सव्वा चार लाख मतदार वगळले

मतदारांनी १६ ऑगस्टपर्यंत नावाची खात्री करण्याची संधी

अहिल्यानगर, ता. १२ ः जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांमध्ये राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचे काम पारनेर मतदारसंघ वगळता पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ३८ लाख मतदारांपैकी सुमारे ४ लाख २९ हजार ११२ मतदारांची माहिती मिळालेली नाही. या सर्व मतदारांची नावे अंतिम मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली आहे.
केंद्रिय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गेल्या सव्वा महिन्यांपासून १२ विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ३८ लाख मतदारांपैकी सुमारे ४ लाख २९ हजार ११२ मतदार हे असंकलित आढळले. असंकलित यादीतील मतदार यांना त्यांच्या मतदारसंघातील नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क करता येईल. याशिवाय स्थानिक सहायक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क करता येईल. याशिवाय जिल्हास्तरावर १९५० हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. याशिवाय सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून मतदारांची ग्रामीण व शहरी भागातील घर क्रमांकाची माहिती मागविण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी दिली आहे.
-----------
मतदारसंघनिहाय वगळलेले मतदार
अकोले ः १६ हजार ३८८
संगमनेर ः २६ हजार ४८२
शिर्डी ः३९ हजार ९७५
कोपरगाव ः ३८ हजार ९
श्रीरामपूर ः ३१ हजार ४२०
नेवासे ः २० हजार ४६१
शेवगाव ः ४१ हजार ५८३
राहुरी ः ३४ हजार ४२७
पारनेर ः ३८ हजार ४३२
अहिल्यानगर शहर ः ६९ हजार ७६६
श्रीगोंदे ः ४० हजार ६१०
कर्जत-जामखेड ः ३१ हजार ५५९
-------------
मतदारांनी १६ ऑगस्टपर्यंत नावाची खात्री करावी
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ नोव्हेंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्‍यात आलेला आहे. त्‍यानुसार ता.१७ ऑगस्ट अखेरपर्यंत मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी हे घरोघरी भेट देऊन गणना फॉर्म (ईएफ) जमा करणार आहेत. अहिल्‍यानगर जिल्‍ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघाचे संगणकीकरण कामकाज पूर्ण झालेले आहे. त्‍यानुसार असंकलित मतदारांची यादी (गैरहजर, स्‍थलांतरीत, मयत, दुबार) अहिल्‍यानगर जिल्‍ह्याचे संकेतस्‍थळ ahilyanagar.nic.in व https://ahilyanagar.maharashtra.gov.in/en/notice/special-intensive-revision-program-2026-asdd-voter-lists/ या लिंकद्वारे उपलब्‍ध होईल.
--------
सदरची यादी संबंधित मतदान केंद्राचे मतदान केंद्रस्‍तरीय प्रतिनिधी (बीएलओ) यांचेकडे देखील उपलब्‍ध करून देण्‍यात आलेली आहे. प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या यादीचे अवलोकन करावे. त्‍यामध्‍ये आपले किंवा आपल्‍या कुटुंबातील सदस्‍यांचे नाव असल्‍यास व त्‍याबाबतचा गणना प्रपत्र/ Enumeration Form स्‍थानिक मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी, स्‍थानिक तहसील कार्यालय यांच्याकडे १६ ऑगस्टपर्यंत भरून दिल्यास प्रारूप मतदार यादीत नावाचा समावेश करता येणार आहे.
-डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नव्या मतदार नोंदणीसाठी महत्त्वाची बातमी! आता नोंदणीवेळी जुळवावी लागणार २४ वर्षांपूर्वीची वंशावळ; प्रशासनाला शोध सोलापुरातील ६ लाख मतदारांचा, वाचा...

Riddhi Thakkar: ‘लेट्स एक्सप्लोर बस्तर...’ २० बाइकरचा ग्रुप, सफरीचं स्वप्न ठरलं अखेरचं, अचानक काळाचा घाला; मुंबईच्या रिद्धीचा दुर्दैवी अंत

Khutbav Accident : नियतीचा खेळ, मृत्यूतही साधला मेळ; रक्षाबंधनापूर्वी बहीण-भावावर काळाचा घाला, पारगावात हळहळ

Talegaon Dabhade News : रस्ता नसल्याने ज्येष्ठाला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ

मोठी बातमी! मराठा समाजातील १.८१ लाख तरुण रोजगार मागणारे नव्हे रोजगार देणारे; ७ वर्षांत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून १८७४ कोटी

SCROLL FOR NEXT