पुणे

Loksabha 2019 : पर्वती विधानसभा मतदारसंघात सोसायट्यांतील मतदारांचा कौल निर्णायक 

योगिराज प्रभुणे

पुणे - पुण्यात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून देणाऱ्या पर्वती मतदारसंघात या वेळी सोसायट्यांतील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले असून, त्यांचा कौल कोणाच्या बाजूला वळणार आहे, यावर येथे कोण बाजी मारणार हे दिसून येणार आहे. 

आमदार माधुरी मिसाळ, महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांच्यासह मतदारसंघातील 27 पैकी 23 नगरसेवक असलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. गेल्या लोकसभा, विधानसभा आणि पाठोपाठ झालेल्या महापालिका निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या झोळीत भरभरून मतं टाकली. त्यामुळे यंदाच्या लोकसभेत या मतदारसंघाने भाजपला नेमकी किती साथ दिली, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मताधिक्‍य देणारा हा मतदारसंघ आहे. येथून पुण्यातील सर्वाधिक म्हणजे 69 हजार मताधिक्‍यांनी मिसाळ निवडून आल्या. महापालिका निवडणुकीतही शहरातून भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. पर्वती मतदारसंघातील सात प्रभागांतील 27 पैकी 23 नगरसेवक भाजपचे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन, तर कॉंग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी एक नगरसेवक आहे. या पार्श्‍वभूमीवर लोकसभा निवडणुकीत पर्वतीतून भाजपला मोठ्या मताधिक्‍याची अपेक्षा आहे. गेल्या लोकसभेला मतदारसंघात 54.85 टक्के मतदान झाले होते. यंदा त्यात 2.78 टक्‍क्‍यांनी घट होऊन 52.07 टक्के मतदानाची नोंद झाली. 

व्यापारी आणि झोपडपट्टीवासीय असा संमिश्र प्रभाग असलेल्या सॅलिसबरी पार्कमधून सर्वांधिक म्हणजे 64 टक्के मतदान झाले. या प्रभागातून चारही जागांवर भाजपचे कमळ फुलले आहे. मात्र, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, आमदार मिसाळ यांची भावजय मानसी देशपांडे यांचा प्रभाग असलेल्या मार्केट यार्डमध्ये सर्वांत कमी म्हणजे 40 ते 42 टक्के मतदान झाले. सोसायट्यांची संख्या मोठी असलेल्या वडगाव बुद्रुक आणि हिंगणे प्रभागात 60 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जनता वसाहत आणि दत्तवाडी या झोपडपट्टी बहुल प्रभागात जेमतेम 47 टक्के मतदान झाले. लक्ष्मीनगर, मित्रमंडळ, पर्वती दर्शन या नवी पेठ-पर्वती प्रभागाच्या परिसरातून 42 टक्‍क्‍यांपर्यंत मतदान झाले. मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय मतदारांचे प्रमाण जास्त असलेल्या सहकारनगरमधून मतदानाची टक्केवारी 59 टक्‍के आहे. 

या विधानसभा मतदारसंघातील सोसायटीत राहणारा मतदार मतदानासाठी केंद्रापर्यंत आलेला दिसत होता; पण त्याच वेळी झोपडपट्टीतील मतदारांची संख्या तुलनेने कमी होती. त्यामुळे सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय मतदारांचा कौल कोणाकडे होता, यावर या मतदारसंघात कोण बाजी मारेल, हे अवलंबून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT