पुणे

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नूतनीकरण कामांचे उद्‍घाटन

CD

वडगाव मावळ, ता. ६ : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ॲस्टेमो फाय कंपनीच्या सीएसआर निधीतून सुमारे ३१ लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या शाळा नूतनीकरण कामांचे उद्‍घाटन करण्यात आले.
ॲस्टेमो फाय कंपनीच्या सीएसआर निधीतून विद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सर्व वर्गखोल्यांचे नूतनीकरण, संपूर्ण इमारतीचे रंगकाम तसेच लिकेज-फ्री काम करण्यात आले आहे. या कामांचे उद्‍घाटन माजी सनदी अधिकारी तथा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी व ॲस्टेमो फाय कंपनीचे डायरेक्टर सुधीर गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले. कंपनीचे प्लांट मॅनेजमेंट हेड ओरिकसा, क्वालिटी हेड श्रीकांत मापारी, एच.आर. हेड संपत फडतरे, कंपनी सेक्रेटरी हर्षवर्धन चिंधळे, अमर मगर, रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, विभागीय अधिकारी संजय मोहिते, साहाय्यक विभागीय अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग भोसले, माजी विस्तार अधिकारी शोभा वहिले, नवीन नवघणे, सुधीर म्हाळसकर आदी उपस्थित होते.
चंद्रकांत दळवी यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी यापुढील काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे सांगितले. रयत शिक्षण संस्थेच्या सुमारे ६५० शाळांमध्ये ६ हजार ५०० इंटरॲक्टिव पॅनल बोर्ड बसविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ॲस्टेमो फाय कंपनीचे एच.आर. हेड संपत फडतरे यांनी कंपनीच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. प्लांट मॅनेजमेंट हेड ओरिकसा यांनी विद्यार्थ्यांशी जपानी भाषेतून संवाद साधला. त्यावेळी योगेश गायकवाड यांनी दुभाषी म्हणून काम केले. सुधीर गोगटे यांनी शाळेच्या गरजा लक्षात घेऊन भविष्यातही आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. माजी विद्यार्थी ललित शहा यांनी पूर्वीची आणि आत्ताची न्यू इंग्लिश स्कूल यामधील बदल अधोरेखित केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. गणेश ढोरे यांच्या वतीने शाळेला दहा पंखे भेट देण्यात आले. कलाशिक्षिका दीपा गुंजाळ यांनी चंद्रकांत दळवी यांच्या छायाचित्राची सुबक रांगोळी साकारली होती. प्राचार्य सतीश हाके यांनी प्रास्ताविक केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. नीता शेटे-खोडदे यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री बोरसे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT