Water Scheme Bhoomipujan sakal
पुणे

Wagholi Water : वाघोलीला प्रति व्यक्ती मिळणार १३५ लिटर पाणी; मात्र त्यासाठी 30 महीने वाट पहावी लागणार

वाघोली-लोहगाव भामा आसखेड पाणी योजनेतून वाघोलीत प्रती व्यक्ती १३५ लीटर पाणी मिळणार आहे. मात्र त्यासाठी किमान ३० महिने वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली - वाघोली-लोहगाव भामा आसखेड पाणी योजनेतून वाघोलीत प्रती व्यक्ती १३५ लीटर पाणी मिळणार आहे. मात्र त्यासाठी किमान ३० महिने वाट पाहावी लागणार आहे. या योजनेच्या अंतर्गत जलवाहिनी कामाचे भूमिपूजन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी झाले.

भामा आसखेड योजनेतील मुख्य जलवाहिनी लोहगाव पर्यंत आली आहे. लोहगाव पासून वाघोलीसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी पुणे महापालिकेने सुमारे २३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये मुख्य जलवाहिनी, अंतर्गत जलवाहिनी व पाण्याच्या टाक्यांचा समावेश आहे. बुधवारी अंतर्गत जलवाहिनी कामाचे भूमिपूजन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते लोहगाव रोड वरील सुयोग निसर्ग सोसायटी जवळ पार पडले. या प्रसंगी शिवदास उबाळे, वसुंधरा उबाळे, ज्योती पाचरणे, सोसायटी धारक, महापालीका अधिकारी उपस्थित होते.

पाणी पुरवठा योजने विषयी

  • लोहगाव - वाघोली पाणी पुरवठा योजना

  • एकूण तरतूद - २३० कोटी रुपये

  • एकूण पाणी पुरवठा - २२१ लाख लिटर

  • एकूण नवीन टाक्या - सहा

पाणी पुरवठा विषयी

  • प्रति व्यक्ती १३५ लिटर पाणी पुरवठा

  • यासाठी ४८० किलोमीटर जलवाहिनी

  • एकूण टाक्यांचा वायर - १२ ( नवीन - सहा, जुन्या - सहा )

  • लोहगाव येथे ४५ लाख लिटर क्षमतेची टाकी

या ठिकाणी असणार पाण्याच्या नवीन टाक्या

१) बाजारतळ

२) आयव्ही इस्टेट

३) कटकेवाडी

४) डायमंड वॉटर पार्क

५) तलाठी ऑफीस

६) टाटा शोरूम मागे

कामाची मुदत

  • कामाची मुदत 30 महिने

  • अंतर्गत जलवाहीनी ४८० किमी

  • मुख्य जलवाहीनी लोहगाव ते वाघोली

  • ठेकेदार - अरिहंत कन्स्ट्रक्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT