पुणे

वाई:-केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अगरवाल यांच्याकडून वाईच्या महागणपतीचे दर्शन. कृष्णा नदीची पूजा व घाटांच्या ऐतिहासिक वास्तुकलेचे कौतुक.

CD

वाईतील मंदिरांच्या कलाकुसरीचे कौतुक

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षांनी दिली भेट

वाई, ता. ११ : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अगरवाल यांनी येथील श्री महागणपती मंदिरास सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले.

महाबळेश्वर येथे आयोजित आयकर विभागाच्या पश्चिम विभागाच्या महत्त्वाच्या बैठकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात ते आले होते. या दौऱ्यादरम्यान अगरवाल यांनी कृष्णा नदीचे पूजन केले. त्यानंतर श्री महागणपती मंदिरात विधिवत अभिषेक व आरती केली. ऐतिहासिक काशीविश्वेश्वर मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. येथील गणपती घाट, घाटांवरील मंदिरे आणि त्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची माहिती त्यांनी जाणून घेतली. महागणपती व काशीविश्वेश्वर मंदिरातील भव्य नंदी, मंदिराच्या मंडपाची प्राचीन रचना आणि उत्कृष्ट कलाकुसरीचे त्यांनी विशेष कौतुक केले. ​
या वेळी महासंचालक (अन्वेषण), पुणे ​जगजीवन कुमार गर्ग, मुख्य आयकर आयुक्त (पुणे) ​विवेक वाडेकर,​ आयकर विभागाचे अतिरिक्त महासंचालक (अन्वेषण) व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महागणपती व काशीविश्वेश्वर मंदिराचे विश्वस्त विश्वास गोखले, सी. व्ही. काळे, वाई अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष अरुण देव, चेतन काळे, लोकमान्य टिळक स्मारक संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय मर्ढेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

------
08239
वाई : महागणपतीची आरती करताना रवी अगरवाल. त्या वेळी मान्यवर.
..........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Circular : राज्य सरकारचा मोठा निर्णय! दहीहंडीची सुट्टी रक्षाबंधनाला जाहीर, शुद्धीपत्रक जारी

Almatti Dam Water Level : आलमट्टी धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! 24 तासांत 89 हजार क्युसेकने पाण्याची आवक; पाणीसाठा 119 टीएमसीवर...

Mumbai Rain: चीनच्या 'डॉल्फिन'ने रोखलेला मान्सून पुन्हा सक्रिय! मुंबई पुण्यासह महाराष्ट्राला सुखावणारी बातमी, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Marathi News Live Updates : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

Madhuri Elephant Return : 'वनतारा'त गेलेली माधुरी हत्तीण परत येणार? उच्चस्तरीय समिती 20 दिवसांत सादर करणार अहवाल, संयुक्त पथकाकडून तपासणी

SCROLL FOR NEXT