Walchandnagar Company successfully manufactures Flanum Shell device for space environment research pune
Walchandnagar Company successfully manufactures Flanum Shell device for space environment research pune sakal
पुणे

वालचंदनगर कंपनीने अवकाशातील वातावरणाच्या संशोधनासाठीच्या फ्लेनम शेल उपकरणाची यशस्वी निर्मिती...

राजकुमार थोरात

वालचंदनगर : भारतीय अवकाश संशोधन संस्था ( इस्त्रो) अवकाशातील वातावरणाच्या संशोधनासाठी स्वदेशी विंड टनेल उपकरण तयार करीत असून यातील महत्वाच्या ‘ प्लेनम शेल’ उपकरणाची यशस्वी निर्मिती वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीने केली सदरचे उपकरण इस्त्रोकडे हस्तांतर केल्याची माहिती वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांनी दिली. या उपकरणाच्या निर्मितीमुळे कंपनीच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

वालचंदनगर कंपनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेबरोबर गेल्या ४५ वर्षापासून कार्यरत आहे. रॉकेटने अवकाशामध्ये उड्डाण केल्यानंतर वातावरणातील दाबाचा यानाच्या उपकरणावरतीपरिणाम होत असतो. याचा अभ्यास करण्यासाठी विक्रम साराभई स्पेस सेंटरने जमीनीवरतीची स्वदेशी ट्रायसोनिक विंड टनेल प्रोजेक्ट विकसित करीत आहे. विक्रम साराभई स्पेस सेंटर ही संस्था वालचंदनगर कंपनीच्या व टाटा प्रोजेक्ट मदतीने देशामध्ये पहिले स्वदेशी विंड टनेल निर्मिती करीत आहे. या विंड टनेलचा उपयोग अवकाशातील पर्यावरणीय परिस्थितीचा आभ्यास करण्यासाठी होणार असून हा इस्त्रोेचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. यामध्ये ११ महत्त्वाच्या उपकरणाचा समावेश असून यातील ५ उपकरणे वालचंदनगर कंपनीने तयार करीत आहे. यातील सेटलिंग चेंबर, फ्लेक्सिबल नोझल ची निर्मिती यशस्वी केली असून प्लेनम शेल या तिसऱ्या उपकरणाची यशस्वी निर्मिती केली आहे.

तसेच मॉडेल कार्ट, व एक्सेंजर पाईपिंगची निर्मिती करण्याचे काम सुरु आहे. स्वदेशी सोनिक विंड टनेलच्या प्लेनम शेल या उपकरणाची लांबी ५.५ मीटर, रुंदी ३.८ मीटर, उंची ४.९ मीटर, वजन ४६ टन असून आज इस्त्रोकडे हस्तांतर करण्यात आले.यावेळी विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उन्नीकृष्णन नायर, टाटा प्रोजेक्ट चे मॅनेजर निवासन रंगनाथन यांनी कार्यक्रमामध्ये ऑनलाईन हजेरी लावली. यावेळी वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी, फॅक्टरी मॅनेजर धीरज केसकर, असिस्टंट व्हाईस प्रसिडेंट पवनकुमार जैन यांच्या हस्ते हस्तांतर हिरवा झेंडा दाखवून हस्तांतर करण्यात आले. विंड टनेलच्या स्वदेशी प्लेनम शेल निर्मितीमध्ये पंकज पवार, राहुल दोशी, अमित शिरोळकर, श्रीधर पनाडा, नितीन खराडे, चंद्रशेखर विचारे, अतुल पुजारी, संभाजी शेलार यांच्यासह कामगारांचा सहभाग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : 'अशा बिनकामाच्या गोष्टींवर मोदी नक्कीच बोलतील..'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याबाबत प्रियांका गांधींची प्रतिक्रिया

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT