पुणे

वळसंग ग्रामदैवत यात्रा १३ मेपासून सुरूवात

CD

PNE26W17906
श्री रामलिंग चौडेश्वरी (ग्रामदैवत)
---
अडीचशे वर्षांच्या परंपरेने
रंगणार बाळबट्टलचा थरार
वळसंग ग्रामदैवत रामलिंग चौडेश्वरी यात्रेस १३ मेपासून प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ९ : अडीचशे वर्षांच्या गौरवशाली परंपरा असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग ग्रामदैवत श्री रामलिंग चौडेश्वरी देवीच्या यात्रेस बुधवारपासून (ता. १३) प्रारंभ होत आहे. ‘बाळबट्टल’चा थरार आणि विलोभनीय रथोत्सव भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. पंचकमिटीच्या वतीने महिनाभरापासून सुरू असलेल्या जय्यत तयारीमुळे संपूर्ण वळसंग नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली आहे.
यात्रेची मंगलमय सुरवात बुधवारी पहाटे ५ वाजता रुद्राभिषेकाने होईल. रात्री ८ वाजता वामनायक मिरवणूक काढण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. १४) रात्री ८ वाजता नृसिंह मिरवणूक पार पडेल. शुक्रवारी (ता. १५) यात्रेतील सर्वात प्रमुख आणि थरारक आकर्षण असलेली ‘बाळबट्टल मिरवणूक’ रात्री १२ वाजता ढोल-ताशांच्या कडकडाटात ग्रामप्रदक्षिणा घालून शनिवारी (ता. १६) सकाळी ७ वाजता या मिरवणुकीची सांगता होईल. दुपारी १२ वाजता श्री रामलिंग चौडेश्वरी देवी मंदिर ते हनुमान मंदिर दरम्यान कुंभ मिरवणूक निघणार आहे. रात्री ८ वाजता बाशिंग, नंदीध्वज व पालखी सोहळा रंगणार आहे.
अडीचशे वर्षांची परंपरा असलेल्या या ऐतिहासिक यात्रेसाठी पंचकमिटीच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, दर्शन रांग आणि महाप्रसादाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या महोत्सवाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन पंचकमिटीतर्फे करण्यात आले आहे.
---
रथोत्सव अन् आतषबाजी
रविवारी (ता. १७) सायंकाळी ७ वाजता भव्य रथोत्सव पार पडेल. बाशिंग काठी आणि मातेच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. याप्रसंगी शोभेच्या दारूकामाची आतषबाजी होणार आहे. सोमवारी (ता. १८) रात्री मनोरंजनासाठी कन्नड सामाजिक नाटक ‘दुडू दारीबिडसीतू’ (अण्ण कणीरू) सादर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

Latest Marathi News Live Update : कुर्ला-चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

प्रवीण तरडेंचा ‘थिएटर व्हिजिट’ पॅटर्न आता बॉलिवूडमध्ये हिट! बॉलिवूडने स्वीकारला ‘तरडे फॉर्म्युला’

West Bengal Politics: पक्षात काहीतरी मोठं शिजतंय? ममतांच्या एका निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ, अचानक उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT