पुणे

नगररचना पहिली इमारत

CD

वर्ध्यात नगररचना विभागाची
राज्यातील पहिली स्वतंत्र इमारत

डॉ. भोयर : ‘वर्धा पॅटर्न’ राज्यभर राबविण्याचे लोकार्पण सोहळ्यात आवाहन

ॲग्रोवन वृत्तसेवा
वर्धा : नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाची राज्यातील पहिली स्वतंत्र इमारत वर्धा येथे उभी राहिली असून, या सुसज्ज इमारतीचे नागरिकांच्या सेवेत लोकार्पण करण्यात आले. इमारत उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीतून ३ कोटी ४९ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. प्रत्यक्षात २ कोटी ३९ लाख रुपये खर्च झाला आहे. राज्यातील इतर कार्यालयांसाठीही या धर्तीवर स्वतंत्र इमारती उभारून त्यास ‘वर्धा पॅटर्न’ म्हणून विकसित करावे, असे आवाहन पालकमंत्री तथा गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाच्या इमारतीच्या लोकार्पणाप्रसंगी डॉ. भोयर बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, नगरविकास विभागाचे संचालक जितेंद्र भोपळे, सहसंचालक विजय शेंडे, सुप्रिया थूल, सहायक संचालक हर्षल गेडाम, माजी संचालक वसंत किन्हीकर, क्रीडाईचे अध्यक्ष महेश गुल्हाणे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले उपस्थित होते.
या इमारतीसाठी प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली असून, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बांधकाम करण्यात आले. इमारतीचा एकूण परिसर १ हजार ८०० चौरस मीटर, तर प्रत्यक्ष बांधकामाचे क्षेत्रफळ ४८८ चौरस मीटर आहे. स्वतंत्र इमारतीमुळे नगररचना विभागाच्या विविध सेवांसाठी नागरिकांना अधिक सुविधा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
‘‘वर्ध्यासारख्या शहरात नगररचना विभागाची स्वतंत्र इमारत उभी राहत असताना राज्य कार्यालयासाठी मात्र स्वतःची इमारत नाही. म्हाडाच्या माध्यमातून राज्य कार्यालयासाठी इमारत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू,’’ असे डॉ. भोयर यांनी सांगितले.
दरम्यान, कार्यक्रमात नगररचना संचालक जितेंद्र भोपळे यांच्या ‘५५ पावसाळे’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला फीत कापून व नामफलकाचे अनावरण करून इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी इमारतीची पाहणी केली. प्रास्ताविक साहाय्यक संचालक हर्षल गेडाम यांनी केले, तर आभार नगररचना अधिकारी भाग्यश्री बोरकर यांनी मानले. विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission चे नवे शेड्यूल जाहीर! ऑक्टोबरपर्यंत बैठका, अंतिम रिपोर्ट आणि वाढीव पगार कधी?

IND vs SL 2nd Test: अरे, चाललंय तरी काय! यशस्वी, असिथानंतर आणखी एका खेळाडूवर ICC ने केली कारवाई; हे नवीन प्रकरण काय?

Dry Fruits Price: रक्षाबंधन, गणेशोत्सवाआधी खिशाला मोठा फटका! कांदा-साखर कमी होती की काय, आता ड्रायफ्रूट्सही महागले, वाचा नवे दर...

Raksha Bandhan 2026 Gift Ideas: बहिणीच्या चेहऱ्यावर हसू आणतील ‘या’ ८ गोष्टी; पाहा एका-पेक्षा-एक भन्नाट गिफ्ट आयडियाज

Marathi News Live Updates : बेंगळुरूमध्ये ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना भरधाव कारची धडक

SCROLL FOR NEXT