Water bell for student to drink water in pune
Water bell for student to drink water in pune 
पुणे

पुण्यात मुलांना पाणी पिण्यासाठी वाजतेय ‘वॉटर बेल’

सकाळ वृत्तसेवा

पुण्यातील पहिलाच प्रयोग; केरळच्या धर्तीवर उपक्रम
पौड रस्ता - केरळ राज्यातील शाळांच्या धर्तीवर एरंडवण्यातील माध्यमिक विद्यालयात अनोखा ‘वॉटर बेल’ उपक्रम राबविला जात आहे. पाणी पिण्यासाठी नियमित ‘वॉटर बेल’ दिली जाते. विद्यार्थ्यांचाही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या उपक्रमाची सुरुवात केरळमध्ये मंगळूरजवळच्या उप्पीनगडी गावातील इंद्रप्रस्थ विद्यालयातून झाली आहे. या शाळेत दिवसातून तीन वेळा बेल वाजवली जाते. ही बेल मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देते. पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पुण्यातील शाळेत प्रथमच हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

विद्यार्थ्यांनी नियमितपणे पाणी प्यावे या दृष्टिकोनातून शालेय तासिकांव्यतिरिक्त दिवसभरातून दोनदा वॉटर बेल दिली जाते. विद्यार्थ्यांना दोन मिनिटांचा विश्रांती दिली जाते. यादरम्यान सर्व विद्यार्थी आपल्या दप्तरातील पाण्याची बाटली काढून एकाच वेळी पाणी पितात. असा उपक्रम राबवणारी एरंडवण्यातील माध्यमिक विद्यालय ही पुणे शहरातील पहिलीच शाळा आहे. 

याबाबत मुख्याध्यापिका नीलिमा खोंडे म्हणाल्या, ‘उपशिक्षक प्रकाश शेलार यांनी हा प्रकल्प राबविला  आहे. विद्यालयातील बहुतांश  विद्यार्थी नियमित पाणीच पीत नाहीत, ही समस्या आमच्या लक्षात आली आहे. शाळेमध्ये तीनशे विद्यार्थी असून, सर्वच्या सर्व विद्यार्थी नियमितपणे पाण्याची बाटली आणतात व वॉटर बेलच्या वेळी पाणी पितात.’ 

उपशिक्षक प्रकाश शेलार म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी भरपूर पाणी प्यावे म्हणून केरळमधील शाळेत दिवसातून तीन वेळेस वॉटर बेल वाजते. पाणी कमी प्यायल्याने डिहायड्रेशन, थकवा येणे, चिडचिड, किंवा मूत्रमार्गात संसर्ग होण्याइतपत समस्या निर्माण होऊ शकतात. खरे तर दिवसातून २ ते ३ लिटर पाणी प्यायला हवे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT