पुणे

पाणीकपातीचा निर्णय पुढील महिन्यामध्ये  

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा आणि त्याचा वापर लक्षात घेता पाणीकपात करावी लागेल. मात्र, त्याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात घेऊ, असे सांगून पुढील काही दिवस पाणीकपात नसल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी स्पष्ट केले. मात्र, सध्याचा पाणीपुरवठा कायम राहील, असेही बापट यांनी सांगितले. त्यामुळे तूर्तास पाणीकपात राहणार नाही. पाण्याच्या गैरवापरावर नजर ठेवण्याचा आदेशही बापट यांनी महापालिकेला दिला आहे. 

शहराच्या पाणीसाठ्यात दोनशे एमएलडी पाण्याची कपात करण्याच्या भूमिकेवर पाटबंधारे खाते ठाम आहे. तसेच, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानेही पाणीसाठा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर बापट यांनी महापालिकेतील पदाधिकारी-सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, रमेश बागवे, अरविंद शिंदे उपस्थित होते.

बापट म्हणाले, ‘‘धरणांत सध्या १७.५ टीएमसी पाणीसाठा आहे. येत्या जुलैपर्यंत पुणेकरांना पिण्यासाठी पाणी पुरेल.’’ दरम्यान, धरणात पुरेसे पाणी असूनही पालकमंत्री पाणीकपात लादत असल्याचे आरोप तुपे आणि शिंदे यांनी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT