जुना विमानतळ रस्ता - फाइव्ह नाइन चौकात हवाई दलाच्या जलवाहिनीतून पाणीगळती सुरू आहे.
जुना विमानतळ रस्ता - फाइव्ह नाइन चौकात हवाई दलाच्या जलवाहिनीतून पाणीगळती सुरू आहे. 
पुणे

विमानतळ रस्त्यावर पाणीगळती

सकाळवृत्तसेवा

पुणे - जुना विमानतळ रस्त्यावर फाइव्ह नाइन चौकाच्या अलीकडे मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे. ही पाणीगळती गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असून, महापालिका पाणीपुरवठा विभागाने हवाई दल पाणीपुरवठा विभागाला याविषयी अनेकदा कळवूनही अद्याप दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.

फाइव्ह नाइन चौकातून नागपूर चाळीच्या दिशेने जाताना डाव्या हाताला असणाऱ्या बसथांब्याशेजारी ही पाणीगळती सुरू आहे. रस्त्यावरून वाहत पुढे ते १०० मीटर पर्यंत पसरते. त्यामुळे अनेकदा वाहन घसरून अपघातही होतात. या ठिकाणी वळण असल्यामुळे वाहनचालकांच्या जिवाला धोका उत्पन्न 
होत आहे. या जलवाहिनीतून हवाईदलाला पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे या पाणीपुरवठा वाहिनीची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी हवाई दल पाणीपुरवठा विभागाची आहे. वाया जाणाऱ्या पाण्याचे महत्त्व लक्षात घेता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीगळती थांबविण्याबाबत हवाई दलाकडे पत्रव्यवहार केला आहे, परंतु त्या पत्रव्यवहाराला अध्याप प्रतिसाद मिळालेला नाही.

याविषयी हवाई दलाच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT