Water level in Dams in Pune district on lower side
Water level in Dams in Pune district on lower side 
पुणे

धरणांतील साठ्यात चिंताजनक घट

सकाळवृत्तसेवा

भवानीनगर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, पुरंदर तालुके दुष्काळाची तीव्रता सहन करीत असतानाच त्यांच्यासाठी एक आणखी कटू बातमी आहे. अवघ्या वीस दिवसांत नीरा देवघर, वीर व भाटघर या तीन धरणांमधून 8 टीएमसी पाणी कमी झाले असून, वीर धरण तर आत्ताच निम्म्यापेक्षा कमी झाले आहे. 

जिल्ह्यातील बहुतांश धरणे 15 ऑक्‍टोबरपर्यंत 100 टक्‍क्‍यांवर भरलेली होती. मात्र, आता सरासरी 76 टक्‍क्‍यांवर आली आहेत. त्यातही नीरा देवघरमध्ये आता 86.95 टक्के साठा आहे. भाटघर धरणात 91.49 टक्के पाणीसाठा आहे. मात्र, नीरा नदी, डावा कालवा व उजव्या कालव्याच्या तोंडाला असलेल्या वीर धरणातील 9.85 टीएमसी पाणीसाठा आता अगदी निम्म्यापेक्षाही कमी झाला आहे. सध्या वीर धरणात केवळ 45.39 टक्के पाणीसाठा आजअखेर शिल्लक आहे. नीरा डाव्या कालव्याला पावसाळ्यातच दोन आवर्तने द्यावी लागल्याने व उजव्या कालव्यालाही पाणी द्यावे लागले. त्यामुळे ऐन पावसाळ्यात कधी नव्हे ते वीर धरण 45 टक्‍क्‍यांवर घसरले आहे. ही घसरण उन्हाळ्यातील भीषण पाणीटंचाईचा प्रत्यय देत आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याची जबाबदारी शेतकरी, व्यावसायिक संस्था व घरगुती वापरदारांनी पाळली नाही, तर जलसंकटाचा धोका या उन्हाळ्यात उद्भवू शकतो. 

या वर्षी पावसाळ्यातच पिके तहानलेली बनल्याने जलसंपदा खात्याला 15 ऑक्‍टोबरदरम्यानच पाणी आवर्तनासाठी सोडावे लागले. परिणामी, पिके वाचली असली, तरी नव्या लागवडींचे भविष्य मात्र टांगणीवर आहे. उसाच्या नव्या लागवडी ऐन उन्हाळ्यात टिकविण्याचे आव्हान यंदा शेतकऱ्यांची कसोटी पाहणार आहे. 

धरणाचा आजचा पाणीसाठा 
धरण- पाणीक्षमता- टक्केवारी 
नीरा देवघर- 11.90 टीएमसी- 86.95 टक्के 
भाटघर- 23.75 टीएमसी- 91.49 टक्के 
वीर- 9.85 टीएमसी- 45.39 टक्के 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

SCROLL FOR NEXT