पुणे

समन्वयातून जलसमृद्ध मराठवाड्याचा मार्ग निर्माण व्हावा

CD

समन्वयातून जलसमृद्ध मराठवाड्याचा
मार्ग निर्माण व्हावा

प्राचार्य अशोक तेजनकर व्यक्त केली

छत्रपती संभाजीनगर : जलविषयक विविध विभागांच्या समन्वयातून जलसमृद्ध मराठवाड्याचा मार्ग निर्माण व्हावा, असे मत प्राचार्य अशोक तेजनकर यांनी व्यक्त केले.

मराठवाडा पाणी परिषदेतर्फे ग्रामविकास भवन, सिडको येथे शनिवारी (ता. ९) दुसऱ्या जलमंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे, जलतज्ज्ञ डॉ. जयसिंग हिरे, डॉ. भगवानराव कापसे, प्रा. शिवाजीराव हुसे, आप्पासाहेब उगले आदी उपस्थित होते.

प्राचार्य तेजनकर म्हणाले की, जलविषयक विविध विभागांच्या अथक प्रयत्नांमुळेच देश अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे. येणाऱ्या काळात जलव्यवस्थापनासाठी शास्त्रोक्त आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रति घनमीटर पाण्यातून अधिक उत्पादन देणारी पिके घेण्यावर भर द्यावा लागेल.

या जलमंथन बैठकीत भूजल, कृषी, जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या प्रतिनिधींनी आपल्या विभागाच्या कार्याचा परिचय करून देत जलव्यवस्थापन क्षेत्रातील योगदानाबाबत सविस्तर माहिती दिली. यामध्ये माजी उपसंचालक (जीएसडीए) भीमराव मेश्राम, सेवानिवृत्त कृषी मंडळ अधिकारी रोहिदास राठोड, निवृत्त जलसंधारण अधिकारी सर्जेराव वाघ तसेच जलतज्ज्ञ डॉ. जयसिंग हिरे यांनी मार्गदर्शन केले.
यंदा ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संसाधन साक्षरता, पाण्याचा कार्यक्षम व उत्पादक वापर, पीक पद्धती, आंतरपीक पद्धती, कमी पाण्यावर येणारी पिके, मूलस्थानी मृदसंधारण, पाण्याचा ताळेबंद तसेच पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यावर भर देण्याची आवश्यकता सर्व वक्त्यांनी व्यक्त केली.

बैठकीचे प्रास्ताविक परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी केले. समाजातील विविध स्तरांतून जलमंथन उपक्रमाला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद तसेच जलसमृद्ध मराठवाड्यासाठीचे आगामी नियोजन याबाबत त्यांनी माहिती दिली. दरम्यान, नरहरी शिवपुरे-ग्रामविकास संस्था यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘जलभूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सरदारसिंग बैनाडे, डॉ. के. एम. वांजरवाडकर, डॉ. राहुल महामुनी, जयप्रकाश बागडे, सतीश वानखेडे, अविनाश मिरकले, अशोक कोळी, शिवाजी घुगे यांच्यासह जलक्षेत्रातील विविध विभागांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जलमंथन बैठक यशस्वी करण्यासाठी परिषदेच्या अर्चना पवार व निवृत्ती घोडके यांनी परिश्रम घेतले.

फोटो कॅप्शन :
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पाणी परिषदेतर्फे आयोजित दुसऱ्या जलमंथन बैठकीत मार्गदर्शन करताना प्राचार्य अशोक तेजनकर. यावेळी रोहिदास राठोड, भीमराव मेश्राम, डॉ. जयसिंग हिरे, सर्जेराव वाघ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: रोहित शर्माची दुखापत ते बुमराह - बोल्टचं अपयश... Mumbai Indians प्लेऑफमधून बाहेर पडण्याची ५ महत्त्वाची कारणं काय?

Mumbai News: पुनर्विकास याचिकेत नव्या विकसकाला नकार, घाटकोपरमधील भाडेकरूंना ठोठावला पाच लाखांचा दंड

Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक जन्मजात असतात खूप भाग्यशाली, ज्यांच्या आयुष्यात जातात त्यांचा गोल्डन टाइम होतो सुरू

‘नोकरी शोध’ आता डिजिटल! डॉक्‍टरांसाठी आयएमएने सुरू केले करिअर ब्युरो

Yavatmal Crime : यवतमाळ हादरलं! प्रियकरासाठी पत्नी झाली क्रूर, अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला विजेचा शॉक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT