mahamarg
mahamarg 
पुणे

ओढा अडविल्याने पाणी नाशिक महामार्गावर

सकाळ वृत्तसेवा

चाकण (पुणे) : चाकण व परिसरात बुधवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसाने येथील वाकी खुर्द (ता. खेड) गावच्या हद्दीतील पुणे-नाशिक महामार्गाला गुरुवारी (ता. 19) सकाळी आठपासून नदीचे स्वरूप आले होते. काही लोकांनी ओढा अडविल्याने पूर्व बाजूला पाणी वाहत नव्हते. त्यामुळे महामार्गावरून अगदी चार फुटांपर्यंत पाणी वाहत होते. काही घरांतही पाणी शिरले. नाशिक बाजूकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा अगदी दोन किलोमीटरवर लागल्या होत्या.
 
पुणे-नाशिक महामार्गावर वाकी खुर्द गावच्या हद्दीत जाधववस्तीजवळ ओढ्यातील पाणी महामार्गावर आले होते. त्यामुळे वाहतूक काही काळ बंद राहिली. त्यानंतर वाहतूक हळूहळू सुरू झाली. याबाबत वाकी खुर्दचे सरपंच रामदास जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव जाधव यांनी सांगितले की, जुना ओढा काही लोकांनी भिंती टाकून अडविला आहे. ओढ्यावर काही लोकांनी प्लॉटींग केले आहे. दोन हजार सहापासून तहसीलदार, महसूल प्रशासनाला याबाबत ग्रामपंचायतीने अर्ज केले आहेत. पण प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. कारवाई करून ओढा खुला करणे गरजेचे आहे. याबाबत बाजीराव वहिले, शांताराम जाधव, बाळासाहेब जाधव यांनीही याबाबत प्रशासनाने तसेच रस्ते कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गावर पाणी का साचते याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगितले.

पाण्यामुळे अनेकांचे नुकसान
ओढ्याचे पाणी अडल्याने शांताराम जाधव यांचा जनावरांचा गोठा, कडब्याची वळई पाण्यात गेली आहे. तसेच संदीप जाधव, विष्णू जाधव, नामदेव जाधव, मच्छिंद्र जाधव यांची घरे पाण्यात गेली आहेत. महसूल प्रशासन, रस्ते कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, वाहतूक विभागाचे पोलिस येथे फिरकले नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला. काही तासाने रस्ते कंपनीचे मजूर आले. त्यांनी पाणी वाहण्यासाठी दुभाजक फोडण्याचा प्रयत्न केला.

आर्थिक तडजोडी झाल्याने ओढा बंद
वाकी खुर्दला काही लोकांनी ओढा अडविला, याबाबत काहींनी माहिती अधिकारात माहिती मागविली होती. ओढा खुला करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु काही आर्थिक तडजोडी झाल्याने ओढा खुला करण्यात आला नाही. महामार्गाच्या पूर्व बाजूला ओढ्याचे पाणी जाण्यासाठी जागा नाही. तसेच ओढ्याच्या दोन्ही बाजूने बांधकामे झाल्याने ओढा गाडलाच गेला आहे. त्यामुळे महामार्गावर पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: तामिळनाडूमध्ये बसचा अपघात; १५ जखमी

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT