Water-Supply
Water-Supply 
पुणे

शहरात पुन्हा पाणीकपात

सकाळ वृत्तसेवा

पुणे - विधानसभा निवडणूक आणि दिवाळीही संपल्याने आता पुणेकरांना पुन्हा पाणीकपात सोसावी लागण्याची शक्‍यता आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा केंद्रांची आठवड्याला दुरुस्ती करीत, दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून सुरू असलेली आठवड्यातील एक दिवसाची पाणीकपात कायम राहणार आहे. जलकेंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीला प्राधान्य आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. 
शहरात अजूनही पाऊस असून, सगळी धरणे शंभर टक्के भरली आहेत. तरीही, पुणेकरांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या प्रचंड तक्रारी आहेत.

धरणांत पाणी असूनही केवळ देखभाल-दुरुस्तीचे कारण देत आठवड्यातून एक दिवस म्हणजे दर गुरुवारी बहुतांश भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. अपुऱ्या पाण्यामुळे पुणेकरांनी निवडणूक आणि दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्याचा फटका बसण्याच्या शक्‍यतेने प्रचारकाळात सर्व भागांत पाच ते सहा तास पाणी सोडण्यात आले. त्यानंतर दिवाळीतही पुणेकरांना पाणी कमी पडणार नाही, याची काळजी महापालिका प्रशासनाने घेतली. या काळात गुरुवारीही पाणी सोडण्यात आले होते. मात्र, काही भागांत पाणी आले नसल्याने रहिवाशांचे हाल झाले. परंतु, वितरणव्यवस्थेतील त्रुटीमुळे पाणीपुरवठा विस्कळित झाल्याचा खुलासा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला होता. निवडणूक आणि दिवाळी संपल्याने पूर्वीप्रमाणे गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, ‘‘शहराच्या सर्व भागांतील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जलकेंद्रांची दुरस्ती वेळेत झाली पाहिजे. त्यासाठीचे नियोजन केले आहे. त्यामुळे काही केंद्रांतून होणारा पाणीपुरवठा दुरुस्तीदरम्यान बंद ठेवावा लागणार आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT