water supply cut off warje karvenagar water pipe line burst old water pipe need to repair pune
water supply cut off warje karvenagar water pipe line burst old water pipe need to repair pune  sakal
पुणे

वारजे-कर्वेनगर भागाकडे जाणारी पाण्याची वाहिनी फुटली; जुन्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर

निलेश बोरुडे

किरकटवाडी: वारजे येथील जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी पुणे महापालिकेची जलवाहिनी खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला काही अंतरावर फुटली असून लाखो लिटर पाणी वाया जाताना दिसत आहे. दरम्यान या घटनेमुळे जुन्या झालेल्या जलवाहिन्या वेळीच दुरुस्त करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

खडकवासला धरणातून वारजे जलशुद्धीकरण केंद्राकडे सुमारे दीड ते दोन मीटर व्यासाच्या दोन जलवाहिन्या गेलेल्या आहेत. यापैकी जुनी जलवाहिनी फुटली असून धरणाच्या मागच्या बाजूला असलेल्या पुलावरून पाण्याचा उंच फवारा उडताना दिसत आहे.

एका बाजूला पाण्याची टंचाई निर्माण झालेली असताना दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जाताना दिसत आहे. किरण सोनवणे यांनी येथील जलवाहिनी फुटल्याची माहिती 'सकाळ' ला दिल्यानंतर तातडीने याबाबत वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम यांना कळविण्यात आले.

पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता व इतर कर्मचारी तातडीने जलवाहिनी दुरुस्तीसाठी रवाना झाले आहेत. जुन्या जलवाहिन्यांची दुरुस्ती गरजेची पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीसह इतर भागात जाणाऱ्या जलवाहिन्या तब्बल वीस वर्षांपेक्षा जास्त जुन्या झाल्या असून अनेक ठिकाणी त्या मातीत गाडल्या गेलेल्या असल्याने गंज चढून जीर्ण झाल्या आहेत.

अचानक या जलवाहिन्या फुटुन लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने या सर्व जुन्या जलवाहिन्यांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी सध्या किरकोळ गळती दिसत आहे तेथे वेळीच दुरुस्ती करण्यात आल्यास पाण्याची नासाडी व परिणामी होणारी नागरिकांची गैरसोय टळू शकते.

"ज्या ठिकाणी जलवाहिनी फुटली आहे तेथे तातडीने दुरुस्ती करून घेण्यास सांगितले आहे. पाणीपुरवठा विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी दुरुस्तीसाठी गेले आहेत."

राजेश गुर्रम, सहाय्यक आयुक्त, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, पुणे मनपा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT