पुणे

साडेचार लाख नागरिकांना 259 टँकरद्वारे पाणीपुरवठा

सकाळवृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागातील 178 गावे आणि 1308 वाड्यांमधील सुमारे साडेचार लाख नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी मावळ वगळता अन्य तालुक्‍यांत 259 टॅंकर सुरू आहेत. यात 249 खासगी आणि दहा सरकारी टॅंकरचा समावेश आहे. 

राज्य सरकारने जिल्ह्यातील सात तालुके आणि अन्य काही मंडळांमधील गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. या तहानलेल्या गावांना आणि वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांना टॅंकरमधून पाणी देण्यात येत आहे. या गावांमधील सुमारे साडेचार लाख नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तसेच सुमारे तीन हजारांहून अधिक पशुधनासाठी टॅंकरद्वारे पाणी देण्यात येत आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी 93 विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. 

तालुकानिहाय टॅंकरची संख्या (1 जून अखेर) 

आंबेगाव : 27 
बारामती : 40 
भोर : 7 
दौंड : 25 
हवेली : 13 
इंदापूर : 45 
जुन्नर : 21 
खेड : 15 
मावळ : 00 
मुळशी : 4 
पुरंदर : 30 
शिरूर : 29 
वेल्हा : 3 

विभागात सोलापूरमध्ये सर्वाधिक टॅंकर 

पुणे विभागातील कोल्हापूर वगळता अन्य चार जिल्ह्यांमध्ये एकूण एक हजार 35 टॅंकर सुरू आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात 259, सातारा 267, सांगली 194 आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 315 टॅंकर सुरू आहेत. या भागातील सुमारे एक लाख 87 हजार नागरिकांना आणि दीड लाख जनावरांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्‍त कार्यालयामार्फत देण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT