Water-Supply
Water-Supply 
पुणे

नवीन वर्षात दिवसभर पाणी

सकाळ वृत्तसेवा

कात्रज - शहराच्या दक्षिण भागातील पाणीसमस्या संपुष्टात आणण्यासाठी पुढील पंचवीस वर्षांचा विचार करून उभारली जात असलेल्या पाणी योजनेला वेग आला आहे. सतत गाजत असलेली शहराची चोवीस तास पाणीपुरवठा योजनेत महापालिकेने कात्रजला प्रथम संधी दिली आहे. नवीन वर्षात या भागाला मीटरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.  

झपाट्याने विस्तारलेल्या कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात गेल्या दहा वर्षांत लोकसंख्याही अनेक पटींनी वाढली आणि पाणीसमस्येने उग्र रूप धारण केले होते. कात्रज गावठाण वगळता उर्वरित भागाला पाण्याची समस्या सातत्याने भेडसावत होती. दिवसाआड, अवेळी, अपुरा पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. स्थानिक नगरसेविका मनीषा कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेत कात्रजला प्रथम संधी द्या, अशी वारंवार मागणी लावून धरली आणि अखेर यश आले. राजस सोसायटी परिसराला शहरात सर्वप्रथम मीटरद्वारे अहोरात्र पाणीपुरवठा देण्याचा प्रयोग करणार आहे. काम वेळेत पूर्ण करा, असा आदेश कामाची पाहणी करायला आलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनीला दिला आहे. 

कात्रज-देहू रस्ता बाह्यवळण मार्गावरील वंडर सिटी परिसरात पंपिंग स्टेशनच्या कामाला सुरवात झाली आहे. महादेवनगर या उंचावरील भागात साठ लाख लिटर साठवण क्षमता असलेल्या टाकीचे काम पूर्ण झाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी भारतनगर, दत्तनगर आणि वरखडेनगर परिसराची अंतिम पाहणी झाली होती. त्यानंतर अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याच्या कामाला सुरवातही झाली आहे.

साठ लाख लिटर टाकीच्या कार्यकक्षेत येणाऱ्या विभागाची पाहणी पूर्ण करून कामाला सुरवात झाली आहे. मुदतीत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. 
- एस. वेंकटराव, निरीक्षक, एल अँड टी 

दोन आठवड्यांपूर्वी ठेकेदार कंपनीच्या निरीक्षकांनी पाहणी करून पूर्वतयारी केली आहे. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे सर्वकाही सुरळीत होईल, असा आमचा प्रयत्न आहे. नवीन वर्षात या भागाला मीटरद्वारे पाणीपुरवठा देणे निश्‍चित शक्‍य होणार आहे.
- सुनील अहिरे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT