Pani
Pani 
पुणे

सातगाव पठारचा पाणीप्रश्न मिटणार

सकाळ वृत्तसेवा

सातगाव पठार (पुणे) : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे मार्फत राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत 16 कोटी रुपयांची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेच्या सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला तीन लाख रुपये खर्च अपेक्षित आहेत. सर्वेक्षणानंतर अंतिम मंजुरीसाठी सरकारची मान्यता घ्यावी लागणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता ए. एम. कांबळे यांनी सांगितले.

पेठ (ता. आंबेगाव) येथे सातगाव पठार भागातील कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव, पेठ आणि निघोटवाडी (दस्तुरवाडी) या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे मार्फत प्रादेशिक योजनेचे अंदाजपत्रक, आराखडे तयार करणे कामी व आखणी करण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली.

याप्रसंगी या योजनेबाबत नागरिकांना माहिती देताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता ए. एम. कांबळे बोलत होते. सदर योजनेअंतर्गत घोडनदीवरील पाणी उचलून ते कुरवंडी येथे साठवले जाणार. कुरवंडी येथे जलशुद्धीकरण करून हे पाणी पुढे सातही गावांत पाइपलाइनद्वारे पोचविले जाणार आहे. सदर योजनेसाठी वार्षिक खर्च हा 42 लाख 42 हजार रुपये एवढा येणार असून या नागरिकांकडून पाणीपट्टीद्वारे 49 लाख रुपये उत्पन्न मिळणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता ए. एम. कांबळे यांनी सांगितले.

याप्रसंगी आंबेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, शाखाअभियंता संजय यादव, जिल्हा परिषदेचे पुणे ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता टोपे, शाखा अभियंता राम पाटील, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, पंचायत समिती सदस्य शीतल तोडकर, विकास बारवे, महेश नवले, विलास घेवडे, सुरेखा पडवळ, अनिता कंधारे उपस्थित होते. सदर सभेदरम्यान रोहिदास चक्कर, संतोष धुमाळ, किसन ढमाले, रवींद्र तोत्रे, मनोहरपंत पवळे आदींनी चर्चेत सहभाग घेत योजनेसंदर्भात माहिती घेतली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला सदर योजनेच्या सर्वेक्षणासाठी तीन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, सातगाव पठारावरील ग्रामपंचायतींकडून या योजनेच्या सर्वेक्षणासाठी दोन लाख रुपये दिले जातील.
- देविदास दरेकर, जिल्हा परिषद सदस्य

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: मनेका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT