dimbhe dam  
पुणे

पुणे, नगर, सोलापूरच्या दीड लाख हेक्टरला संजीवनी

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पडलेल्या पावसामुळे डिंभे धरण 97 टक्के (12.03 टीएमसी) भरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आज सायंकाळी साडेपाच वाजता डिंभे धरणाच्या (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) दोन दरवाजातून 2000 क्यूसेकने पाणी सोडण्यात सुरुवात केली आहे. 27 ऑगस्टपासून वीजगृहातून 500 क्यूसेक पाणी घोडनदी पात्रात सोडले जात आहे. लवकरच डिंभे उजव्या कालव्यातून 125 क्यूसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. 

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर, नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांना डिंभे धरणाच्या पाण्याचा जास्त उपयोग होतो. आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्याला 12 महिने पाणी पुरते. तर, श्रीगोंदा व करमाळा तालुक्यातील शेतीला 8 महिने पाणी दिले जाते. धरणातील पाणी साठ्यामुळे पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील 1 लाख 49 हजार 161 हेक्टर क्षेत्राला संजीवनी मिळणार आहे.  

डिंभे धरणाची उपयुक्त पाणी साठवण क्षमता 12.50 टीएमसी आहे. सध्या 12.03 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणात भीमाशंकर, आहुपे व पाटण खोऱ्यातून सकाळपासून जोरदार पाऊस झाल्याने धरण साठ्यात मोठी वाढ झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दोन दरवाजातून 2000  क्यूसेकने घोड नदीपात्रात  सायंकाळी साडेपाच वाजता पाणी सोडण्यात सुरुवात केली. 27 ऑगस्टपासून 500 क्यूसेकने वीजगृहातून पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे घोड नदीवरील बंधाऱ्यात पाणीसाठा झाला आहे.    

धरणक्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप केली आहे. आज सकाळपासून आदिवासी भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. आजपर्यंत धरणक्षेत्रात 723 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मागील वर्षी या वेळेला 1379 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. आदिवासी भागातील मुख्य भात पिकाचे 5 हजार 200 हेक्टर क्षेत्रात लागवड झाली असून, भात खाचरे भरली असल्याने भाताचे पीक तरारले आहे. 

कुकडी प्रकल्पांतर्गत आंबेगाव तालुक्यातील 29 हजार 513 हेक्टर, जुन्नर तालुक्यातील 57 हजार 208 हेक्टर, शिरूर तालुक्यातील 27 हजार 311 हेक्टर, पारनेर तालुक्यातील 21 हजार 870 हेक्टर, श्रीगोंदा तालुक्यातील 13 हजार 177 हेक्टर, अकोले तालुक्यातील 75 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. यात डिंभे धरणातील साठ्याचा मोठा उपयोग होत आहे. 10 वर्ष किरकोळ प्रकार वगळता पाण्याचे वाटप गरजेप्रमाणे व विश्वासाने झाल्याने या शेतकऱ्यांमध्ये बागायती क्षेत्र करण्याकडे कल वाढला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT