पुणे

विधानसभेमध्ये 220 पेक्षा अधिक जागा जिंकू : दानवे 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : "आगामी विधानसभा निवडणूक आपण शिवसेनेला सोबत घेऊन लढणार असलो, तरी आपल्याला 220 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी प्रत्येक नागरिकाला पक्षासोबत जोडण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,'' असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी (ता. 6) केले. 

गंज पेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहात भाजपच्या सदस्यनोंदणी अभियानास रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सुरवात झाली. या वेळी खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक, दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, दीपक मिसाळ, उज्ज्वल केसकर उपस्थित होते. 

दानवे म्हणाले, ""आमच्याशिवाय कोणीच पर्याय नाही, असे खोटे चित्र कॉंग्रेसने करून देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण केले होते. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसची अवस्था खूपच वाईट झाली. त्यांनी लोकसभेत रणांगण सोडले होते. आता कॉंग्रेसला अध्यक्ष नाही. नवीन कोणी अध्यक्ष होण्यास तयार नाही, अशी बोचरी टीका दानवे यांनी केली. 

गिरीश बापट, मुक्ता टिळक यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. योगेश गोगावले यांनी प्रास्ताविक केले. मुरलीधर मोहोळ यांनी सूत्रसंचालन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT