weather update cold fever body pain patients increased due to changing temperature health
weather update cold fever body pain patients increased due to changing temperature health sakal
पुणे

Weather Update : बदलत्या तापमानामुळे पुणेकर बेजार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहर व परिसरात ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरण निर्माण होत आहे. त्यातच दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री व पहाटे जाणवणारी थंडी यामुळे तापमानात चांगलीच तफावत होत आहे.

परिणामी या बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत असून विषाणुजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याचे डॉक्‍टरांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्दी-खोकला, अंग दुखी, ताप, नाक वाहणे आदी लक्षणे असलेल्या रुग्‍णांची संख्या वाढत आहे.

गेल्या आठवडाभरापासून शहर व परिसरात पावसाची ये-जा कायम आहे. एकीकडे दिवसा कमाल तापमानाचा चढलेला पारा यामुळे उन्हाचा ताप वाढू लागला असून दुपारनंतर पुन्हा अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण होत आहे.

या बाबत संसर्गजन्यरोग तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड म्हणाले, ‘‘शहरातील सध्याचे वातावरण हे संसर्गजन्य आजारांसाठी पूरक ठरत आहे. दिवसा ३५ अंश किंवा त्यापेक्षा अधिक तापमानाचा पारा असतो, आणि दुपारी पुन्हा पावसाच्या सरी पडल्यावर रात्री तापमानात घट होते.

गेल्या दहा दिवसापासून हे चित्र कायम आहे. यामुळे तापाच्या रुग्णांची चाचणी करताना त्यात स्वाईन फ्लू, इन्फ्‍लुएन्झा, काही प्रमाणात कोरोना रुग्णे आढळून येतात. मूत्रपिंड विकार, कर्करोगाचे उपचार अशा प्रकारच्या रुग्णांना न्यूमोनिया देखील होत आहे. त्यांच्या वैद्यकीय समस्या वाढत असून आयसीयूमध्‍ये त्यांना ठेवण्याची वेळ येत आहे. यामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाण ज्येष्ठ नागरिकांचे आहे.’’

दिवसा ऊन, रात्री थंडी हे विषम हवामानाचा प्रकार आहे. हे वातावरण विषाणूंच्या वाढीसाठी अत्यंत पोषक असल्याने अनेकांना विषाणुजन्य आजार किंवा ताप येत असल्याचे आढळून येत आहे. अशा वातावरणाचा सर्वाधिक जास्त धोका सहव्याधी असलेल्या आणि ज्येष्ठांना आहे.

बऱ्याचदा उन्हाळ्यात बाहेरचे पेय किंवा खाद्य पदार्थ खाल्ले जातात. यामुळे पोटाचे संसर्ग देखील लोकांना होत आहेत. आता उन्हाळी सुट्ट्या असल्याने मुले तासनतास उन्हामध्ये खेळतात. त्‍यामुळे पालकांनी देखील याची काळजी घेण्याची गरज आहे. ’’

- डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, महापालिका

या आरोग्याच्या समस्या सर्वाधिक

- श्र्वसनाच्या संसर्गाचे प्रमाण जास्त

- पोटाचा संसर्ग किंवा व्हायरल गॅस्ट्रोएंट्राइटिस

- उन्हाच्या तीव्र झळांमुळे उष्माघाताचा धोका

- विषाणुजन्य आजार किंवा ताप

हे करा

- दिवसभरात किमान ४ लिटर पाणी प्या

- कोरोनाबरोबरच संसर्गजन्य आजारांसाठी आवश्‍यक त्या लसीकरण करणे गरजेचे

- बाहेरून आल्यावर एकदम थंड पाणी पिऊ नये

- बाहेर पडताना शक्यता पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे, स्कार्फ आणि टोपी वापरणे

- लहान मुलांना दीर्घकाळ उन्हामध्ये थांबू देऊ नये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT