weather update possibility of rain in konkan vidarbha Orange Alert in Mumbai and Konkan Chance of rain in Pune
weather update possibility of rain in konkan vidarbha Orange Alert in Mumbai and Konkan Chance of rain in Pune  sakal
पुणे

कोकण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्याच्या पश्चिम भागात मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणासह घाटमाथ्यावर पावसाला सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. २०) कोकणासह विदर्भात मुसळधार पाऊस. तर दक्षिण मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रातही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकणात वेधशाळेने ऑरेंज अलर्ट दिला आहे. मॉन्सून संपूर्ण राज्य व्यापले असून, कोकण, विदर्भासह राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान झाले आहे. कोकणच्या विविध भागात शनिवारपासूनच पावसाला सुरवात झाली आहे. हरियाना आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

विदर्भापासून तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह पूर्व भारतात, तर अरबी समुद्रातून मॉन्सूनचे प्रवाह वाढल्याने किनारपट्टी भागात ढगांची दाटी झाली आहे. कोकणात आजपासून (ता. २०) जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यात सोमवारनंतर पाऊस

सक्रिय होणाऱ्या मॉन्सूनमुळे सोमवार (ता.२०) नंतर शहरासह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. विशेष करून घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आठवडाभर आकाश सामान्यतः ढगाळ आणि दुपारनंतर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचे संकेत देण्यात आले आहे. हा आठवडा पुणेकरांसाठी पावसाचा ठरण्याची जास्त शक्यता आहे. रविवारी शहर व परिसरात दिवसभर ढगाळ हवामान होते. त्यामुळे सरासरी कमाल तापमान ३२.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)

मध्य महाराष्ट्र : सातारा, कोल्हापूर,

विदर्भ : यवतमाळ, चंद्रपूर.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT