weather update pune Signs of rising heat wave
weather update pune Signs of rising heat wave  e sakal
पुणे

उन्हाचा कडाका वाढण्याची चिन्हे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहर आणि परिसरात सोमवारी काही ठिकाणी रिमझीम पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा पसरला होता. या वातावरणामुळे उकाड्यापासून थोडी सुटका झाली. मात्र, शहरात आकाश पुन्हा निरभ्र होत उन्हाचा कडाका वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आता पुणेकरांना उन्हाचा चटका पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळी उन्हाचे सावट कायम होते मात्र दुपारनंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले. तसेच काही मुख्य शहरासह उपनरातील काही भागांमध्ये वारे देखील वाहत होते, आणि बघता बघता तुरळक भागात पाऊस पडला. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. सोमवारी शहरात ३९.१ अंश सेल्सिअस कमाल आणि २१.७ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.

हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे व परिसरात पुढील आठवडाभर आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. मात्र एखाद-दुसऱ्या दिवशी अंशतः ढगाळ वातावरणाची ही शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या घरात पोचू शकतो. परिणामी नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT