mulashi
mulashi 
पुणे

मुळशी : बाहेर पडू नका, पोलिसांकडून नाकाबंदी; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

सकाळ डिजिटल टीम

कोळवण: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुळशी तालुक्यात पौड पोलिसांकडून कडक अंमलबजावणी केली जात आहे. भूगाव व घोटावडे फाटा येथे नाकाबंदी करून वाहनचालकांकडे विचारपूस करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. त्याशिवाय विनाकारण भटकंती करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाईवर भर देण्यात आला आहे. 

दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी सहा ते सायंकाळी सहा असे दुकानदार तसेच नागरिकांना खरेदी विक्री करण्यासाठी वेळ घालून दिली होती. नागरिकांकडूनही बाजारपेठेतील सर्व व्यवहार सायंकाळी सहा पूर्वीच बंद करून प्रशासनाला सहकार्य केले. नियम तोडणाऱ्या पाच दुकानांवर तहसिलदार अभय चव्हाण यांनी कारवाई करत दुकाने सिल केली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची वाहनांतून पेट्रोलिंग करण्यात येत आहे. वाढत असलेल्या कोरोनामुळे शासनाने शनिवार व रविवार पूर्णपणे लाँकडाऊन पुकरलेला आहे.

शनिवार व रविवार पुकारण्यात आलेल्या लाॅकडाऊनचे मुळशी तालुक्यात काटेकोरपणे पालन होत असून जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आलेल्या आहे. पौड पोलिसांनीही भुगांव आणि घोटावडे फाटा येथे नाकाबंदी केली असून अत्यावश्यक कामासाठीच येथून वाहनाना प्रवेश देण्यात येत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे मुळशीत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार नियम मोडून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याशिवाय अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या नागरिकांची अडवणूक करू नये, अशा सूचना बंदोबस्तावरील पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
–अशोक धुमाळ(पोलिस निरिक्षक, पौड पोलिस स्टेशन)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT