valhe
valhe 
पुणे

माउलींच्या विठाईवर परतीच्या प्रवासात वाल्मिकनगरीत फुलांचा वर्षाव 

किशोर कुदळे

वाल्हे (पुणे) : हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास। 
पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी ।। 

याप्रमाणे सावळ्या विठुरायाच्या भेटीनंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पादुकांचा वारी सोहळा परतीच्या प्रवासात सजविलेल्या लालपरी विठाईमधून वाल्मिकनगरीतून ज्ञानियांची नगरी अलंकापुरीकडे आज दुपारी मार्गस्थ झाला. यावेळी वाल्हेकरांनी पुन्हा एकदा विठूनामाच्या जयघोषात पुष्पवृष्टी करत माउलींचे स्वागत करून निरोप दिला.

पंढरपुरनगरीमधील आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न करून आज परतीच्या प्रवासासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पादुका सोहळ्याची विठाई हि लालपरी आकर्षक रंगबेरंगी पानाफुलांनी सजुन अलंकापुरीकडे निघाली होती. सायंकाळी सात वाजता या सोहळ्याचा प्रवेश वाल्मिकनगरीमध्ये झाला.

दरवर्षी परतीच्या प्रवासात या सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील पहिला मुक्काम वाल्हे येथील महर्षि वाल्मिकी विद्यालयाच्या प्रांगणाध्ये होत असतो. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे काल आषाढी एकादशीचा सोहळा आटोपून आज पालखी थेट आळंदीला जाणार होती. त्यामुळे आज देखील वाल्हेकरांनी आळंदी- पंढरपूर पालखी महामार्गालगत महात्मा फुले पुतळ्यानजिक महामार्गाच्या दुतर्फा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत फुलांची विठाईवर मुक्त उधळण केली. तसेच, हरिनामाच्या गजरात त्यांचे स्वागत करत निरोप देखील दिला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावे ळी वाल्ह्याचे सरपंच अमोल खवले, सचिन लंबाते, प्रा. संतोष नवले, आडाचीवाडीचे सरपंच दत्तात्रेय पवार, सुर्यकांत लंबाते, गोरख कदम, सागर भुजबळ, सचिन जाधव, अनिल दुर्गाडे, श्रीकांत पवार, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. या वेळी जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली बी. व्ही. जगदाळे, समीर हिरगुडे आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : इशान किशन अन् नेहलनं डाव सावरला

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT