पुणे

अधिकारी सरकारची महिलांना भेट

CD

कोलकता, ता. २२ (पीटीआय) ः पश्‍चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजप सरकारने आपल्या पहिल्यात अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री असलेल्या स्वपन दासगुप्ता यांनी आज विधानसभेमध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अन्नपूर्णा योजनेसाठी ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाचीही घोषणा केली आहे.
राज्यात एक लाख रिक्त पदे भरणार असल्याची घोषणा दासगुप्ता यांनी केली. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यामध्ये २० पर्सेंटेज पॉईंटनी वाढ देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. ‘‘मागील सरकारच्या धोरणांमुळे राज्यावर तब्बल ८.१५ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा असल्याने आर्थिक नियोजनामध्ये शिस्त आणण्याची आणि प्रशासनामध्ये सुधारणा करण्याची आवश्‍यकता आहे,’’ असे दासगुप्ता यांनी सांगितले.

महिलांसाठी विविध योजनांची घोषणा
महिलांना मोफत बस प्रवास सुरूच राहणार, यासाठी ५५० कोटींची तरतूद
पिंक कार्ड व्यवस्था सुरू करणार
महिला विश्वविद्यालयांची स्थापना करणार
शाळांमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसविण्यात येणार

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतूदी
- पोलिस खात्यात २० हजार तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ५० हजार रिक्त पदे भरण्याची घोषणा
- अग्निवीरांसाठी दहा टक्के जागा राखीव
- ज्येष्ठ, विधवा आणि दिव्यांगांना देण्यात देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये दरमहा ५०० रुपयांची वाढ
- अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आणि शिक्षक साहाय्यक यांच्या मानधनात दरमहा पाच हजार रुपयांची वाढ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Pradhan On Resignation जेन झींची दिशाभूल केली, राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधानांनी सोडलं मौन; पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

Jharkhand Tourism : झारखंडचा लोध धबधबा; जिथे पाण्याच्या प्रचंड प्रवाहात दडले आहे अथांग डोहाचे गूढ!

UP Career Guidance: IAS-IPS अधिकारी आता थेट शाळेत; १२ वीच्या विद्यार्थ्यांना करिअरचे धडे देणार योगी सरकार

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज, १० जिल्ह्यांना अलर्ट; विजांसह वादळी पावसाचा इशारा

India Justice Access Reforms: न्यायालयापर्यंत पोहोचणे सोपे करा; CJI सूर्यकांत यांचा विधी सेवा यंत्रणेला संदेश, मुख्यमंत्र्यांना आठवल्या अहिल्यादेवी

SCROLL FOR NEXT