पुणे

खडकवासलातून पाणी सोडल्यानंतर केव्हा वाढतो धोका?

निलेश बोरुडे

खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर आपत्कालीन परिस्थिती केव्हा उद्भवते?मुठा नदीकाठच्या रहिवाशांची चिंता केव्हा वाढते?

किरकटवाडी : सध्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यास दि. 22 जुलैपासून सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे व मुठा नदीकाठच्या लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभाग व पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. आठ ते दहा हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला तर नांदेड-शिवणे पुल आणि सुमारे पंधरा हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला तर भिडे पुल पाण्याखाली जातो.

मुठा नदी पात्रातील सुरुवातीला नांदेड-शिवणे पुल व त्यानंतर भिडे पुल पाण्याखाली गेल्यानंतर पाऊस वाढत राहिला आणि खडकवासला धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्यास नदीकाठी राहणाऱ्या पुणेकरांची चिंता वाढण्यास सुरुवात होते.40 हजार क्युसेकने विसर्ग सुरू झाला की आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज होते. विसर्ग 50 हजार क्युसेकच्या जवळ गेल्यानंतर प्रशासनाकडून युद्ध पातळीवर मदत व बचाव कार्य सुरू करण्यात येते.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहीतीनुसार, मुठा नदीकाठची चिंता केव्हा वाढते?

मुठा नदीची उजवी बाजू.......

1) नांदेड गावातील नदीलगतचा भाग- विसर्ग 55 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

2) वडगाव बुद्रुक स.नं. 14 व 15 - विसर्ग 55 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

3)हिंगणे खुर्द स. नं. 18 - विसर्ग 55 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

4) अलंकार पोलीस चौकीजवळील भाग कर्वेनगर रस्ता-विसर्ग 55 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

5)पूना हॉस्पिटल जवळील नदीलगतचा भाग-विसर्ग 45 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

6) सीताबाग कॉलनी नारायण पेठ-विसर्ग 45 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

7) अष्टभुजा मंदिर नारायण पेठ- विसर्ग 45 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

8) अमृतेश्वर मंदिराजवळील भाग शनिवार पेठ, ओटा घाट, नेने घाट-विसर्ग 45 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

9)शेख सल्ला दर्गा, डेंगळे पुल कसबा पेठ-विसर्ग 45 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

10)मनपा वसाहत कसबा पेठ-विसर्ग 45 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

11)बारणे रोड मनपा वसाहत मंगळवार पेठ-विसर्ग 45 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

12)गाडीतळ झोपडपट्टी भिमनगर मंगळवार पेठ-विसर्ग 45 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

13)ताडीवाला रस्ता झोपडपट्टी परिसर-विसर्ग 45 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

14)आंबिल ओढ्यालगतचा भाग-विसर्ग 45 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

15) दत्तवाडी व राजेंद्रनगर- विसर्ग 55 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

मुठा नदीची डावी बाजू......

1)कोंढवेधावडे(भिमनगर, समाजमंदिर परिसरातील ओढ्यालगतचा भाग)-विसर्ग 55 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

2)न्यु कोपरे (इंदिरानगर)-विसर्ग 55 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

3) उत्तमनगर (इंदिरानगर वसाहत)-विसर्ग 55 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

4)शिवणे(नदीलगतचा भाग)-विसर्ग 50 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

5)वारजे(तपोधाम)-विसर्ग 55 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

6)एरंडवणा(खिलारे वस्ती)-विसर्ग 40 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

7) डेक्कन जिमखाना (पुलाची वाडी)-विसर्ग 35 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

8) डेक्कन जिमखाना (पीएमटी टर्मिनल्स)-विसर्ग 40 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

9)शिवाजीनगर(तोफखाना परिसर)-विसर्ग 40 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

10) शिवाजीनगर (कामगार पुतळा)-विसर्ग 30 हजार क्युसेकच्या पुढे गेल्यावर.

पूरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदतीसाठी संपर्क.....

आपत्ती व्यवस्थापन विभाग टोल फ्री क्र. 1077

दुरध्वनी-02026123371

Email:- controlroompune@gmail.com

जिल्हाधिकारी- 02026114949

अधिक्षक अभियंता पाटबंधारे विभाग-02026126941, 9422316114

कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग-02026127309, 9422517335

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT