how-to-dignose-Heart-Attack.jpg 
पुणे

हृदयविकाराची लक्षणे जाणवताच 'या' टेस्ट करा तातडीने

डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकार तज्ज्ञ

हृदयविकार म्हणजे ‘कोरोनरी आर्टरी डिसीज’चे निदान करण्यासाठी काही सुलभ आणि साध्या तपासण्या करता येतात. आपण हृदयविकार तज्ज्ञाकडे जातो, तेव्हा ते रुग्णाची रक्त आणि इतर शारीरिक तपासण्या करतात. त्याचप्रमाणे, गरजेनुसार इतर काही तपासण्या करायला सांगतात.

आपण काही महत्त्वाच्या तपासण्या पाहू. 

१) इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम (ईसीजी) : ही अत्यंत साधी आणि सगळीकडे उपलब्ध असलेली तपासणी आहे. या तपासणीमध्ये हृदयाच्या इलेक्ट्रिकल जाळ्याविषयी माहिती मिळते. छातीत दुखत असेल अथवा छातीमध्ये जळजळ होत असेल, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरेने जवळील डॉक्टरांकडे जाऊन ही तपासणी करून घ्यावी. या तपासणीमध्ये आपल्याला हृदयविकाराचा झटका आला आहे की नाही आणि हृदयाला रक्तपुरवठा होत आहे का, हे कळते. पहिला ईसीजी नॉर्मल आला असल्यास १५ मिनिटांनंतर दुसरा ईसीजी काढून घ्यावा. या व्यतिरिक्त डॉक्टर आपल्याला ‘कार्डियाक एन्झाइम्स’ ही रक्ततपासणी करायलाही सांगू शकतात. 

२) कार्डियाक एन्झाइम्स : CPK MB ही तपासणी करून त्याची रक्तातील पातळी तपासतात. हृदयविकाराच्या झटक्याच्या पाच तासांच्या आत ही तपासणी केल्यास पातळी वाढलेली आढळते. ईसीजी नॉर्मल असल्यावरही ही तपासणी निदान करू शकते. याशिवाय ‘ट्रोपोनिन आय’ ही तपासणीदेखील हृदयविकाराचे निदान करू शकते. त्रास झाल्यानंतर अडीच आठवड्यांपर्यंत या चाचणीतून हृदयविकाराचे निदान होऊ शकते. 
हृदयविकाराच्या इतर काही महत्त्वाच्या चाचण्यांची माहिती आपण पुढील भागात घेऊ. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Lung Health: तुमचं वय वाढतंय अन् फुफ्फुसे वेगाने थकतात! वयानुसार 'लंग हेल्थ' कडे दुर्लक्ष नका करू; वाचा काय सांगतात तज्ज्ञ...

SCROLL FOR NEXT