पुणे

पुणे : पाच वर्षांत दहा लाख रोजगार उपलब्ध करून देणार : सुरवसे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत येत्या पाच वर्षांत एक लाख सूक्ष्म आणि लघू उद्योगांच्या माध्यमातून 10 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालय आणि महाराष्ट्र उद्योजकता केंद्र (एमसीईडी) शिवाजीनगर यांच्या वतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत विभागीय कार्यशाळेच्या उद्‌घाटन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी सुरवसे म्हणाले, युवक-युवतींना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य सरकारच्या आर्थिक सहाय्यातून उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना राबविण्यात येत आहे.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्यासाठी स्थानिक तरुणांना स्वयं-रोजगाराकडे आकर्षित करुन सूक्ष्म व लघू उपक्रम स्थापित करणे हा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा उद्देश आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. युवा वर्गात उद्योजकतेची प्रेरणा निर्माण होण्यासाठी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, संगणकतज्ज्ञ विजय जाधव, उद्योग संचालनालयाचे उद्योग अधिकारी सुरेश लोंढे, पी. डी. रेंदाळकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे सहायक सरव्यवस्थापक अभिनव काळे, एमसीईडीचे विभागीय अधिकारी मदनकुमार शेळके, यू.डी. क्षीरसागर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

लाज वाटत नाही?... जुई गडकरीचा डीपफेक VIDEO व्हायरल; सुपरस्टार मराठी कपलच्या मुलासोबत जोडलं नातं, कोण आहे तो?

Marathi News Live Updates : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज सुनावणी

Solapur Politics: ‘नातू’ शिकवू लागले, पण ‘आजोबा’ आजोबाच! अमोल शिंदेंचा देशमुखांच्या भाजपअंतर्गत विरोधकांना टोला; चंद्रकांतदादांचे ‘देर है, अंधेर नहीं’

SCROLL FOR NEXT