V Muraleedharan MP
V Muraleedharan MP Sakal
पुणे

पुणे जिल्ह्यातील विमानतळ पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार; व्ही. मुरलीधरन

सकाळ वृत्तसेवा

पुणे जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक बुधवारी झाली.

पुणे - स्मार्ट सिटीच्या कामांच्या (Smart City Work) अंमलबजावणीत लोकप्रतिनिधींच्या सूचना (Suggestions) विचारात घ्याव्यात आणि सल्लागार समितीची बैठक नियमितपणे घेतली जावी, असा आदेश पुणे जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीचे (दिशा) अध्यक्ष व्ही. मुरलीधरन (V Muraleedharan) यांनी बुधवारी (ता. २) झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत बोलताना दिला. याशिवाय पुणे जिल्ह्यातील विमानतळ (Airport) पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुणे जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक बुधवारी झाली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू आदी उपस्थित होते. खासदार प्रकाश जावडेकर, गिरीश बापट आणि सुप्रिया सुळे यांनी आॅनलाईन पद्धतीने बैठकीत सहभाग घेतला.

या बैठकीत मुरलीधरन यांनी केंद्र सरकारच्या निधीतून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी बोलताना मुरलीधरन म्हणाले, ‘‘देशात ‘स्वच्छ शहर’ म्हणून पुण्याला पाचवे स्थान मिळाले आहे. पुणे हे माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) आणि वाहन उद्योगात (ऑटोमोबाइल) या दोन्ही क्षेत्रांचे नेतृत्व करणारे शहर आहे. पिंपरी-चिंचवड शहराला स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ३९१ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. या निधीच्या माध्यमातून प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रात सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यामध्ये स्मार्ट क्लास रूम, शिक्षकांचे प्रशिक्षण आदी बाबींवर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेत पिंपरी चिंचवडमध्ये ७२ हजार घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत ११ हजार घरे बांधण्यात आली आहेत. आणखी चार हजार ७०० घरांचे बांधकाम सुरू आहे. याशिवाय पुण्याच्या नवीन विमानतळाचा विषय महत्त्वाचा आहे. तो पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.’’

‘डिसेंबरपर्यंत ३२ किलोमीटर मेट्रो मार्गिका’

पुणे शहरातील मेट्रोसाठी आवश्‍यक असणाऱ्या एकूण जमिनीपैकी आतापर्यंत ९८ टक्के जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. येत्या डिसेंबर अखेरपर्यंत (डिसेंबर २०२२) शहरातील ३२ किलोमीटर इतकी मेट्रोची मार्गिका पूर्ण करण्यात येणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT