online fraud Sakal
पुणे

Pune Crime : एमएनजीएल गॅस कनेक्शन बंद करण्याच्या बहाण्याने महिलेची पावणेदहा लाखांची फसवणूक

एमएनजीएल गॅस कनेक्शन बंद करण्याच्या बहाण्याने एका महिलेची पावणेदहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना आली समोर.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - एमएनजीएल गॅस कनेक्शन बंद करण्याच्या बहाण्याने एका महिलेची पावणेदहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी एका महिलेने (वय ५८, रा. गणेशनगर, धायरी) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी फिर्यादी महिलेला मोबाईलवर तुम्ही गॅसचे बिल न भरल्यास कनेक्शन बंद करू, असा संदेश पाठविला. त्यावर महिलेने त्या मोबाईल क्रमांकावर एमएनजीएलच्या कथित अधिकाऱ्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने महिलेला तुम्हाला व्हॉटसॲपवर पाठविलेली एपीके ॲप डाऊनलोड करा, असे सांगितले.

महिलेने ते ॲप डाऊनलोड केल्यानंतर डेबिट कार्डची माहिती भरण्यास सांगितली. त्यानंतर ओटीपी विचारून महिलेच्या बॅंक खात्यातून १७ वेळेस बँक व्यवहार करून नऊ लाख ८० हजार रुपये परस्पर काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT