पुणे

मांडवगण फराटा परिसरात बिबट्याकडून महिलेवर झडप

CD

मांडवगण फराटा, ता. २६ : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील गोकुळनगर गोकुळनगर परिसरात उसाच्या शेतात काम करणाऱ्या लिलाबाई बाळासाहेब फराटे या महिलेवर बिबट्याने गुरुवारी (ता. २५) सायंकाळी सातच्या सुमारास हल्ल्याचा प्रयत्न केला. लिलाबाईंनी प्रसंगावधान राखून तातडीने बाजूला झेप घेतल्याने त्या थोडक्यात बचावल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळनगर येथील लिलाबाई बाळासाहेब फराटे या नेहमीप्रमाणे उसाच्या शेतात काम करत होत्या. सायंकाळी सातच्या सुमारास अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे बिबट्याची झेप चुकली आणि तो पसार झाला. घटनेनंतर घाबरलेल्या लिलाबाई फराटे यांनी तत्काळ शेतातून बाहेर पडून घरी धाव घेतली. त्यांनी कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी केली. दरम्यान, वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वैभव फराटे यांनी केली आहे.

सातत्याने बिबट्याचे दर्शन
मांडवगण फराटा परिसरात ऊस शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. यापूर्वीही या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतात काम करणाऱ्या महिला व नागरिक दररोज जीव मुठीत धरून काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT