Women agitation Bhavani Peth sakal
पुणे

पुणे : भवानी पेठेत पाणी देता का पाणी करीत महिलांचे आंदोलन

भवानी माता मंदिर परिसरात सतत कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा

- मोहिनी मोहिते --------

पुणे : भवानी पेठेतील भवानी माता मंदिर परिसरात सतत कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असून, मागिल दोन दिवसांपासून पाणी न आल्यामुळे नागरिकांनी आज (दि. २३ मार्च २०२२) आंदोलन केले. सीमा खेडेकर, भावना मकवाना, मयुरी राजकोंडा यांच्यासह परिसरातील शेकडो महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.तसेच 553 भवानी पेठ भागात विनोद शेलार, मिरा कोबिनिअर, कल्पना खवळे यांच्या घरात तर पाणी येत नसल्याची तक्रार यावेळी त्यांनी केली आहे.

यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी पाणी देता कोणी पाणी असा गलका केला. पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा देत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला धारेवर धरले. नगरसेवकांनी आतापर्यंत आश्वासनापलिकडे काहीही दिले नाही. त्यामुळे आमच्यावर आता आंदोलन करण्याची वेळ आल्याचे महिलांनी सांगितले.

दरम्यान, मागिल दोन महिन्यांपासून रस्ते खोदाई करताना अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटली आहे, तर काही ठिकाणच्या जलवाहिनी जुन्या झाल्याने गंजल्या आहेत. त्यामुळे पाणी गळती होत असल्याने कमी दाबाने पाणी येते. प्रशासनाने जीर्ण आणि जुनी जलवाहिनी बदलून तातडीने नव्या जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा सुरळीत करावा, असे राष्ट्रवादीचे जुबेर बाबू शेख यांनी यावेळी सांगितले.या संबंधित भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी महापालिका सहाय्यक आयुक्त गणेश सोनुने यांनी सांगितले की पाणी पुरवठा अधिकारी अधिकाऱ्यांना या समस्येबाबत सूचना देण्यात आली आहे, यावेळी त्यांनी पाहणी केली असून लवकरच या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT